• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

शेती कामासाठी शेतकऱ्यांना मिळणार मोफत अवजारे; शेती अवजारे बँकेचा शुभारंभ

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in बातम्या
July 2, 2022 | 5:03 pm
Launch of Agricultural Tools Bank


जळगाव :
भरारी फाउंडेशन जिल्हा प्रशासन कृषी विभाग जळगाव व उभारी प्रकल्पा अंतर्गत शेतकरी संवेदना अभियानाच्या माध्यमातून ‘शेती अवजारे बँकेचा’ शुभारंभ शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांच्या उपस्थितीत झाला. या बँकेच्या माध्यमातून अल्पभूधारक गरजू शेतकऱ्यांना शेतीची अवजारे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त अल्पबचत भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हाभरातील १०० गरजू अल्पभूधारक शेतकऱ्यांना यावेळी मोफत बियाणे वाटप करण्यात आले.

भरारी फाउंडेशन गेल्या काही वर्षांपासून शेतकरी संवेदना अभियान राबवित असून याअंतर्गत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातात व कर्जबाजारी, अल्पभूधारक शेतकऱ्यांना उभारी देण्याकरीता विविध माध्यमातून मदतीचा हात दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून ” शेती अवजारे बँक ‘ यामध्ये नवीन ट्रॅक्टर टिलर नांगर रोटावेटर अशा दहा लाख रुपयांच्या औजार बँकेचे सामुग्रीचे अनावरण मान्यवरांच्या हातून करण्यात आले आत्महत्याग्रस्त कुटुंब असेल जे शेतकरी अल्पभूधारक गरीब व कोरडवाहू शेती करणारे शेतकरी आहेत किवा ज्यांच्याकडे नांगर, टिलर, रोटावेटर, करण्यासाठी पैसे नाहीत अशा शेतकऱयांना ही औजार बँक मोफत उपलब्ध करून दिली जाईल.

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या थांबल्या पाहिजे व शेतकरी सक्षम झाला पाहीजे म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे दीपक परदेशी यांनी सांगितले. शेतकरी आत्मनिर्भर झाला पाहिजे शेतकऱ्याने नवनवीन पद्धतीचा वापर करून प्रगती केली पाहिजे व संपूर्ण प्रशासन शेतकऱयांचा पाठीशी आहे शेतकरी हा देशाचा कणा आहे असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले भालचंद्र पाटील, यांनी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यानं बद्दल संवेदना जागवल्या व शेतकऱयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले रजनीकांत कोठारी यांनी पुढील वर्षी नवीन ट्रॅक्टर घेऊन देण्याचे आश्वासन दिले व त्याचवेळी शंभर शेतकऱ्यांना मका ज्वारी तूर बाजरी व सोयाबीनचे बियाणे देण्यात आले.

त्यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जळगाव पीपल्स बॅंकेचे माजी अध्यक्ष व वेगा केमिकलचे संचालक भालचंद्र दादा पाटील, के. के. कॅन्सचे संचालक रजनीकांतकाका कोठारी, सनशाइन ऍग्रोचे संचालक राजेशभाऊ चौधरी, श्रीराम ऍग्रोचे श्रीराम पाटील, स्पार्क इरिगेशनचे रवींद्रजी लढ्ढा, तनिष्क शोरूमचे कुशल गांधी, लक्ष्मी ऍग्रोचे बाळासाहेब सुर्यवंशी, सोयो उदयोग समूहाचे किशोरभाऊ ढाके, उदयोजक अनिशभाई शहा, पारसभाई राका, स्वरूप लुंकड, सपन झुंनझुंनवाला, लखीचंदजी जैन, चंदन अत्तरदे, अशोक चौधरी ,पवन जैन, अजिंक्य देसाई हे सर्व मान्यवर उपस्थित होते पद्मालय फार्मर प्रोड्युसर कंपनी, एकचक्र शेतकरी उत्पादक कंपनी, हायटेक बियाणे उत्पादक कंपनी , राहुल पाटील, दीपक परदेशी, मोहित पाटील, सचिन महाजन, रितेश लिमडा, दीपक विधाते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
e pik app

‘ई-पीक पाहणी’, शेतकरी अन् कृषी विभागाचे काम हलके होणार

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट