नव्या हळदी सौद्याच्या प्रारंभ; वाचा काय आहे परिस्थिती

- Advertisement -

सांगली : जिल्ह्यातील हळद काढणी सुरुवात झाली असून, येत्या काही काळात काढणीचा वेग वाढणार आहे. दोन दिवसांपूर्वी सांगली बाजार समितीत नव्या हळदीचे सौदे सुरू झाले असले तरी, नव्या हळदीची आवक पंधरा दिवसानंतर वाढेल, असा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील हळद काढणी सुरू झाली आहे. तरी हळद उत्पादक शेतकऱ्यांनी आपली हळद जास्तीत जास्त विक्रीसाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली येथे घेऊन यावे. तसेच शेतकऱ्यांसाठी चालू असणारी शासनाची हळद/बेदाणा शेतीमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.

जिल्ह्यात ७७४ हेक्‍टरवर हळदीची लागवड आहे. यंदाच्या हंगामातील शेतकरी हळद काढणीसाठी शेतकरी नियोजन करत आहेत. जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज मौजे डिग्रज, वाळवा तालुक्यातील हळद काढणी सुरुवात झाली आहे. ओल्या हळदीचे एकरी उत्पादन एकशे १०० ते १२० क्विंटल होत असून, हळद वाळल्यानंतर ती ३० ते ३२ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असल्याचे माहिती हळद संशोधन केंद्राच्या सूत्रांनी दिली. सध्या हळद काढण्यास गती नसली तरी पुढील आठवड्यापासून हळद काढणीचा वेग वाढेल.

दरात तेजीचा व्यापाऱ्यांचा अंदाज

सांगली बाजार समितीत यंदाच्या हंगामातील नव्या हळदीचा सौद्याच्या प्रारंभ झाला आहे. दरम्यान ३ हजार ९५६ पोत्यांची आवक झाली होती. १२ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता. गेल्या काही दिवसांपासून हळदीच्या दरात तेजी असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होईल. मात्र नवीन हळदीची आवक होण्यास १५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. हळदीची आवक वाढली तरी दरात तेजी राहील, असा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

हे देखील वाचा :

हे देखील वाचा