पुणे : कोरोनानंतर कुक्कुटपालन व्यवसायाला घरघर लागली आहे. त्यातच आता पशुखाद्यांचे दर वाढले आहेत. मात्र त्या तुलनेत कोंबडी आणि अंड्यांचे दर वाढत नसल्याने अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत पोल्ट्री फार्मर्स आणि ब्रीडर्स असोसिएशनकडून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिण्यात आले आहे.
कोंबडीचे खाद्य तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयाबीन, मका आणि शेंडपेंडीच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या फूड कॉर्पोरेशनच्या गोदामातील मका, ज्वारी, तांदूळ, कणी हे यासारखे कोंबड्याचे अन्न सवलतीच्या दरात देण्याची मागणी पोल्ट्री फार्मर्स आणि ब्रीडर्स असोसिएशने पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे.
काय आहे पत्रात?
महाराष्ट्रात गेल्या दोन दशकापासून महाराष्ट्रात पोल्ट्री व्यवसाय सुरु आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत पोल्ट्री फार्मर्स यांचे केवळ अफवेमुळे अधिकचे नुकसान झाले होते. त्यामुळे विक्री कमी होत असून कच्च्या मालावर संकट उभे ठाकले आहे. पक्ष्यांना खाद्य म्हणून मका, सोयाबीन याला महत्व आहे. मात्र, याचे दरही गगणाला भिडलेले आहेत. मका १६ ते २२ हजार रुपये टन तर सोयाबीन ५ हजार ते ६ हजारावर गेले आहे. याचा परिणाम पोल्ट्री फार्मर्स यांना वाढीव दराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या फूड कॉर्पोरेशनच्या गोदामातील मका, ज्वारी, तांदूळ, कणी हे यासारखे कोंबड्याचे अन्न सवलतीच्या दरात देण्याची मागणी करण्यात आली आहे.
हे देखील वाचा :