पुणे : काही बाजार समित्यांमध्ये शेतकर्यांची व्यापार्यांकडून होणारी लूट आता थांबण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यातील बहुतांश शेतकारी आता ई-नाम या ऑनलाईन प्लेटफॉर्मवरुन पिकांचे व्यवहार करु लागले आहेत. शेतकरी आता ई-नाम वर आंतरराज्य व्यापाराद्वारे त्यांचे उत्पादन इतर राज्यांना विकत आहेत. यासाठी शेतकर्यांना त्यांच्या मालाची वाहतूक किंवा वाहून नेण्याची गरज नाही, परंतु ई-नामशी संबंधित व्यापारी सर्व ऑनलाइन निर्णय घेतात आणि स्वतः शेतकर्याकडे येऊन उत्पादन घेतात. यामुळे शेतकर्यांचा खर्च कमी होवून नफ्यात वाढ होत आहे.
आज, ई-नामद्वारे, बरेच शेतकरी शेतातूनच पिकांचे व्यवहार करत आहेत. यामुळे मंडी वाहतुकीचा खर्च वाचतो, तसेच शेतमालाला घरबसल्या मागणीनुसार भाव मिळतो. सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे ई-नाम हे केवळ एका कृषी बाजारपेठेपुरते मर्यादित नाही तर आज त्याची व्याप्ती देशातील २१ राज्यांतील हजारो बाजारपेठांमध्ये पसरली आहे. ई-नाममध्ये सामील होऊन शेतकरी आपला माल देशातील कोणत्याही बाजारपेठेत विकू शकतात आणि त्यांच्या सोयीनुसार किंमतही ठरवू शकतात. फक्त भाजीपाला, डाळी, धान्य यासह ई-नामवर मासे विकूनही तुम्हाला चांगला भाव मिळू शकतो. अलीकडे मासळीचा आंतर-मंडी व्यापार करून शेतकर्याला त्याच्या बोलीनुसार भाव मिळत आहे.