मुंबई : जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकरी रासायनिक खते व किटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतात. यावर नेहमीच चर्चा देखील होत असते. मात्र आता याच कारणावरुन तांदूळ उत्पादक शेतकर्यांना कोट्यावधी रुपयांचा फटका बसला आहे. नेमके कशामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
चार महिन्यापूर्वी बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये प्रचंड वाढ झाली होती. पण आता याच तांदळाला नाकारले जात आहे. या तांदळाला का नाकारण्यात आले? याचे कारण शोधनांना मुळाशी गेल्यावर रासायनिक खते व किटकनाशकांच्या अतिवापरामुळे निर्यातीसाठी तांदूळ नाकारण्यात आला असल्याचे धक्कादायक कारर समोर आले आहे. सध्या खरीप हंगामातील धान पिकाच्या लागवडीची लगबग सुरु आहे. असे असताना शेतकर्यांनी योग्य खताचा आणि मर्यादित वापर करणे हाच एकमेव पर्याय आहे. अन्यथा भविष्यात बासमती तांदूळ उत्पादकांचे आणखीन नुकसान होणार आहे.
तांदळाच्या उत्पादन वाढीसाठी पाण्याचे व्यवस्थापन आणि रासायनिक खताचा डोस महत्वाचा आहे. पण आता शेतकरी अधिकच्या उत्पादनासाठी खताचा अतिरेक वापर करतात. पण शेतकर्यांचा हाच निर्णय त्यांच्यासाठी धोकादायक ठरत आहे. रसायनमुक्त उत्पादनाची मागणी होत असताना दुसरीकडे धान उत्पादनासाठी खताचा वापर वाढत जात आहे. त्यामुळे बासमती तांदळाकडे निर्यातदार पाठ फिरवत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
किटकनाशकांच्या अतिवापरामुळे बासमती तांदळाच्या निर्यातीवर परिणाम झाला असला तरी याबाबत शेतकर्यांना योग्य ती माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे शेतकरी हे नियमित खताचा वापर करीत राहिले. त्यामुळेच अधिकचे नुकसान झाले आहे. शेतकर्यांना संबंधित यंत्रणने ही माहितील दिली असती तर गतवर्षी खताचा वापर नियंत्रणात झाला असता. शिवाय शेतकर्यांचे नुकसान टळले असते.