‘या’ जिल्ह्यात सुरू होणार बांबूपासून इथेनॉल तयार करण्याची रिफायनरी

- Advertisement -

लातूर : जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थकारणाला गती देऊ शकेल, अशा बांबूची या वर्षात पाच हजार एकरांवर बांबू लागवड करण्यात येईल. येत्या काळात जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर बांबूपासून इथेनॉल तयार करण्याची रिफायनरी सुरू करण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. लोदगा येथील देशातल्या पहिल्या बांबू टिश्‍युकल्चर तयार करणाऱ्या ‘अलमॅक बायोटेक लॅब’ च्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन देशमुख यांच्या हस्ते झाले. ‘‘महाराष्ट्राच्या कृषीचे भविष्य बदलवू शकणारा बांबूचा पथदर्शी प्रकल्प लातूर जिल्ह्यातून होत असल्याचा आनंद आहे, असे देशमुख यांनी सांगीतले.

आमदार अभिमन्यू पवार, प्रकल्पाचे प्रमुख पाशा पटेल, महाराष्ट्र बांबू बोर्ड, औरंगाबादचे संचालक पी. बी. भालेराव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गवसाने, आंतरराष्ट्रीय बांबू तज्ज्ञ संजीव करपे, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार भरत सूर्यवंशी, अभिजित साळुंखे उपस्थित होते.

एअर कार्गोसाठी पाठपुरावा

प्रकल्पाचे प्रमुख पाशा पटेल म्हणाले, ‘‘जगभरातील सोयाबीनचे भाव लातूरमध्ये ठरतात, ही अभिमानाची बाब आहे. ही किमया लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे. येत्या काळात जिल्ह्यात कृषिमध्ये क्रांतिकारक बदल घडून येतील, हे ओळखून आपण लातूर विमानतळ ‘एअरकार्गो, ड्राय इन लँडङ्क पोर्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव दिला आहे. त्याचा पाठपुरावा सुरू आहे.ङ्कङ्क

देशात गरजेपेक्षा निम्मे उत्पन्न
पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाची परवानगी आहे. मात्र, इथेनॉलच्या कमतरतेमुळे कंपन्या २ टक्केच ब्लेंडिंग करतात. १० टक्के मिश्रणासाठी कंपन्यांना दरवर्षी २६० कोटी लिटर इथेनॉल हवे. मात्र, देशात फक्त २५० कोटी लिटर इथेनॉलचेच उत्पादन होते.

इथेनॉल निर्मिती स्वस्त
मका उत्पादनात उर्वरकांचा उपयोग होतो. मात्र, बांबूंसाठी नाही. इथेनॉल बनवण्यासाठी विशेष जातीच्या बांबूंचा वापर होतो. शिवाय यास पडीक जमीनही चालते. वर्षांत त्याची तीन पिके घेता येतात.

हे देखील वाचा