पुणे : आंब्याच्या हंगामापूर्वी आंब्याची पहिली पेटी पुण्यात दाखल झाली आहे. यानंतर येथे पहिल्या आंब्याच्या पेटीचा लिलाव झाला. या लिलावात राज्यातील आंब्याची पहिली पेटी तब्बल ३१ हजार रुपयांना विकली गेली आहे.
आंबा उत्पादनात घट असो की वाढ फळांच्या राजाचे म्हणजेच हापूस आंब्याचे महत्व कायम राहिलेले आहे. यंदा तर अनेक संकटावर मात करीत हापूस कोकणातून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होत आहे. यापूर्वी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूस आंब्याची एंन्ट्री झाली होती. आता वातावरण निवळले असून हापूस आंबा मार्केटमध्ये दाखल होत आहे.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूसचे आगमन झाले असून मुहूर्ताच्या सौद्यामध्ये 5 डझनाच्या पेटीला तब्बल 40 हजार 599 असा दर मिळालेला आहे. अर्थात एका आंब्यासाठी व्यापाऱ्याला 676 रुपये मोजावे लागले आहेत. वातावरणातील बदलामुळे यंदा देवगडचा हापूस बाजारात उशिराने दाखल होत आहे. मात्र, खवय्यांना त्याचीच प्रतिक्षा असून दराचा विचार न करता खरेदी केली जात आहे.
दरवर्षी या सुरुवातीच्या आंब्यांचा विधी म्हणून लिलाव केला जातो. कारण त्यातून पुढील दोन महिन्यांच्या व्यापाराचे भवितव्य ठरते.’ ही आंब्याचा पेटी खरेदी करण्यासाठी लिलाव आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ५,००० रुपयांपासून बोली लागली आणि ३१,००० रुपयांपर्यंत गेली. पुण्याच्या बाजारात आलेल्या आंब्याच्या पहिल्या पेटीला १८,००० रुपये, दुसऱ्या पेटीला २१,००० रुपये, तिसऱ्याला २२,५०० रुपये आणि चौथ्या पेटीला २२,५०० रुपयांना बोली लागल्याचे व्यापाऱ्याने सांगितले. तर पुणे बाजारात लिलाव करण्यात आलेला ही पाचवी पेटी आहे. ती ३१,००० रुपयांना विकली गेली. गेल्या ५० वर्षात पुण्याच्या मार्केटमध्ये ही सर्वाधिक बोली आहे,’ असे व्यापाऱ्यानी सांगितले.
चव अन् सुगंध उत्तम
कोल्हापूरात कोकणासह कर्नाटकातून हापूस आंब्याची आवक होत असते. कोकणातील रत्नागिरी, देवगड, सिंधुदुर्ग, मालवण यासह किनारपट्टीच्या भागातून आवक होत असते. दरवर्षी कोल्हापूरातील खवय्येगिरींना हापूसच्या आगमानाची मोठी उत्सुकता असते. रत्नागिरी हापूस आंबा आकाराने लहान असला तरी त्याचा सुगंध आणि चव अप्रतिम असल्याने ग्राहकांना त्याची प्रतिक्षा असते. यंदा पहिल्या टप्प्यात पुणे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हापूसचे आगमन झाले होते. त्यानंतर आता कोल्हापुरात आगमन झाले आहे.
एका आंब्याची किंमत 676 रुपये
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 डझनाची एक पेटी दाखल झाली आहे. बाजारात हापूस आंबा दाखल होताच त्याच्या सौद्याला सुरवात झाली होती. मुहूर्ताच्या हापूसला दरवर्षीच विक्रमी दर मिळतो. गतवर्षी 625 रुपयांना एक आंबा पडला होता तर यंदा 676 रुपायांना. 5 डझनाची एक पेटी ही तब्बल 40 हजार 599 रुपायांना विकली गेली आहे. हे मुहूर्ताचे दर असले तरी यंदा घटलेले उत्पादन आणि निसर्गाची अवकृपा यामुळे दर चढेच राहतील असाच अंदाज व्यक्त केला जात आहे.
15 जूनपर्यंत सुरु राहणार आवक
निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा आवक थोडीफार उशिराने झाली असली तरी 15 जूनपर्यंत हापूस आंब्याची आवक सुरु राहणार आहे. हंगामाच्या सुरवातीला मुंबई येथे आवक सुरु होते. कारण येथील वातावरण आंबा पिकवण्यासाठी पोषक असते. त्यामुळे 4 ते 5 दिवस आगोदर आंबा दाखल झाला तरी काही परिणाम होत नाही. मात्र, कोल्हापूरात एक दिवस आगोदरच हापूस आंबा दाखल होता. आता 15 जूनपर्यंत आवक सुरु राहणार असल्याने खवय्येगिरांना चव चाखता येणार आहे.
हे देखील वाचा :