शेतकर्‍यांनो व्यापारी झाल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीच; मनमाडच्या शेतकर्‍यांचा प्रयोग राज्यभरात चर्चेत

onion 1

मनमाड : कांद्याच्या दराची घसरगुंडी अद्यापही सुरुच आहे. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात शेतकर्‍यांनी बाजारपेठेत विक्रीसाठी कांदा आणला असतांना त्याला भावच मिळत नाहीए. गेल्या काही दिवसांपूर्वीत ४० क्विंटल कांदा विक्रीसाठी आणलेल्या शेतकर्‍यालाच खिशातून पैसे द्यावे लागल्याचे समोर आले होते. कमीअधिक प्रमाणात राज्यभर सारखीच परिस्थिती आहे.

अनेक बाजार समित्यांमध्ये मागणी नसल्याने लिलाव देखील झालेले नाही. शेतकरी कांदा घेऊन बाजारपेठेमध्ये दाखल झाले तरी व्यापारी त्याकडे पाठ फिरवून बसत असत आहेत. असाच प्रकार मनमाड येथे घडला. गोल्टी कांद्याकडे नाक मुरडत व्यापार्‍यांनी या कांद्याला कवडी मोल भाव दिला होता. शिवाय उपकार केल्यासारखे खरेदी केली होती. मात्र, व्यापार्‍यांची ही मक्तेदारी तोडण्यासाठी शेतकर्‍यांनी एकत्र येत चांगल्या प्रतीचा पण गोल्टीच कांदा थेट व्हिएतनामला निर्यात केला. ज्या ठिकाणी गोल्टी कांदा फुकटात देण्याची वेळ आली तिथेच आता २० किलो असा दर मिळाला आहे तो ही मध्यस्तीविना.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेंव्हा गोल्टी कांद्याला भाव मिळत नसल्याने मनमाडमधील तरुण व्यापारी फजल कच्छी व त्यांचे सहकारी नदीम शेख यांनी शेतकर्‍यांना एकत्र करून त्यांच्याकडील कांदा गोळा केला आणि दोन कंटेनर भरून व्हिएतनामला निर्यात केला. त्यामुळे या कांद्याला व्हिएतनामसह इतर देशांत चांगला भाव मिळाला अजून ८ ते १० कंटेनर पाठविण्यात येणार असल्याचे कच्छी यांनी सांगितले. व्यापार्‍यांच्या मनमानीत शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत असते मात्र शेतकर्‍यांनीच मार्केट हातामध्ये घेतल्यावर काय होऊ शकते हे मनमाडमध्ये समोर आले आहे. शेतकर्‍यांच्या ना प्रयोगाचे राज्यभर कौतूक होत आहे.

Exit mobile version