नवी दिल्ली : मोदी सरकारने आज फॉस्फरस खत आणि पोटॅश खतांवरील नवीन पोषण-आधारित दरांना मंजुरी दिली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या दुसर्या सहामाहीत किंवा रब्बी हंगामात फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांसाठी शेतकर्यांना ५१,८७५ कोटी रुपयांचे अनुदान दिले जाईल. यासंदर्भातील प्रस्तावाला सरकारने बुधवारी मंजुरी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने २०२२-२३ रब्बी हंगामात झघ खतांसाठी पोषक तत्वांवर आधारित सबसिडी दरांना मंजुरी दिली, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. नायट्रोजनसाठी प्रति किलो ९८.०२ रुपये, फॉस्फरससाठी ६६.९३ रुपये प्रति किलो, पोटॅशसाठी २३.६५ रुपये प्रति किलो आणि सल्फरसाठी ६.१२ रुपये प्रति किलो अनुदान मंजूर केले आहे.