नाबार्ड भर्ती २०२२: स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी रिक्त जागा, ३० जूनपर्यंत अर्ज करा

nabard recruitment

मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकासने (नाबार्ड) विशेषज्ञ अधिकार्‍यांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी १४ जूनपासून भरती प्रक्रिया सुरू झाली असून या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२२ आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट www.nabard.org ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

नाबार्ड भरती २०२२ महत्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात – १४ जून २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जून २०२२

रिक्त जागा तपशील
चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर-१
सीनियर इंटरप्राइज आर्किटेक्ट – १
सोल्यूशन आकिर्टटेक्ट (सॉफ्टवेअर १)
डाटाबेस एनालिस्ट कम डिजाइनर-१
यूआई/यूएक्स डिझायन किंवा डेवलपर-१
सीनियर सॉफ्टवेयर इंजीनियर (फुल स्टैक जावा)-२
सॉफ्टवेयर इंजीनियर-२
क्यूए इंजीनियर-१
डाटा डिजाइनर-१
बीआई डिजाइनर-१
बिजनेस एनालिस्ट-२
अप्लीकेशन एनालिस्ट-२
ईटीएल डेवलपर्स-२
पावर बीआई डेवलपर-२

शैक्षणिक पात्रता : नाबार्डमधील स्पेशालिस्ट ऑफिसर्सच्या पदांसाठी, उमेदवारांनी बीई/बीटेक किंवा एम.टेक. अधिक तपशीलांसाठी सूचना पहा.
पगार : मुख्य तंत्रज्ञान अधिकारी पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ४.५० लाख रुपये मिळतील. सर्व पात्र उमेदवार १४ जून ते ३० जून २०२२ या कालावधीत स्पेशलिस्ट ऑफिसर भर्ती २०२२ साठी (NABARD Specialist Officer Recruitment) अधिकृत वेबसाइट nabard.org वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अर्ज शुल्क : यासाठी उमेदवारांना ८०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तथापि, अनुसूचित जाति, अनुसूचित जनजाति आणि पीडब्ल्यूबीडी श्रेणीतील उमेदवारांना फक्त ५० रुपये भरावे लागतील.

Exit mobile version