अहमदनगर : कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात अनेक तरुणांनी नोकर्यांच्या मागे न लागता शेती करण्याचा निर्णय घेतला. यात बहुतांश जणांना यश मिळाल्याच्या बातम्या वाचण्यात येतात. असाच एक उच्चशिक्षित तरुण म्हणजे प्रविण झरेकर.
अहमदनगर जिल्ह्यातील घोसपुरी गावातील रहिवासी असलेल्या प्रविणचे बीएस्सी ऍग्रीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. त्यानंतर प्रविणनने नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा निर्णय घेतला. हळद शेतीचा प्रयोग त्याने यशस्वी करुन दाखवला आहे. प्रविणने २ एकरवर शेलम वाणाच्या हळदीची लागवड केली होती.
ही शेती करण्यासाठी प्रविणला एकरी ५० हजार रुपयांचा खर्च आला होता. हळद पावडर बनवण्यासाठी एकरी ५० हजार रुपये खर्च येतो. खर्च वजा जाता प्रविणला एकरी ३ लाखांचा नफा मिळला आहे. हळद पावडर बनवण्यासाठी, वितरणासाठी घरच्यांची होते मदत होत असल्याचे प्रविणने सांगितले.
हळदीचे उत्पादन घेतांना त्यावर कोणत्याही प्रकारचे रासायनिक फवारणी केली नाही. शेणखत मोठ्या प्रमाणावर हळदीला टाकल्याचे यावेळी प्रविणने सांगितले. हळदीची काढणी केल्यानंतर ती स्वच्छ करावी लागते. १५ ते २० दिवस ती वाळवावी लागते असे झरेकर याने सांगितले. फक्त हळदीवर थांबलो नाही तर त्यापासून पावडर देखील तयार केली असल्याचे प्रविणने सांगितले.
हे देखील वाचा :
- मल्टी लेयर फार्मिंग तंत्रातून शेतकरी कमवू शकतात ३ ते ४ पट नफा; जाणून घ्या सविस्तर
- शेतातील मातीची सुपिकता वाढविण्यासाठी हा आहे तज्ञांचा सल्ला; तुम्हीही अवलंब करा होईल मोठा फायदा
- पीकविमा योजनेत सहभागी होणार्या शेतकर्यांची संख्या तब्बल ८ लाखांनी वाढली, हे आहे कारण
- नुकसानग्रस्त शेतकर्यांना मुख्यमंत्री शिंदेनी दिले असे आश्वासन की सगळेच झाले खुश
- गोमूत्राचा बीजप्रक्रियेसह कीटकनाशके म्हणून असा करा वापर; होतील मोठे फायदे