मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर सर्व क्षेत्रातील परिस्थिती कोरोनापूर्व काळाप्रमाणे येत होती. मात्र ओमिक्रॉनने डोकं वर काढलं. याचा फटका अनेक क्षेत्रांना बसला यातून शेतकरीही सुटले नाहीत! ओमिक्रॉनचा सर्वाधिक परिणाम कापूस उत्पादक शेकर्यांवर दिसून येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, ओमिक्रॉनमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यवहार हे थंडावले असून त्याचा परिणाम थेट आता राज्यातील जिनिंग उद्योगावर होत आहे. आतापर्यंत राज्यातील ५०० जिनिंग प्रोसेसमधून २२ लाख गाठींची निर्मिती ही झाली आहे. तर यंदा कापूस हंगामात ७० लाख गाठींची निर्मिती होईल असे संकेत सुरवातीला वर्तवण्यात आले होते. मात्र, सध्या ओमिक्रॅानचा वाढता प्रादुर्भाव, नाताळ्याच्या सुट्ट्या आणि कापूस दराबाबत अनिश्चितता यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे.
कापसाचेही सोयाबीनप्रमाणेच झाले आहे. हंगामाच्या सुरवातीला कापसाला ९ हजार ५०० चा दर मिळालेला होता. मात्र, आता यामध्ये घट झाली आहे. घटत्या दरामुळे बाजारपेठेतली आवकही कमी झाली आहे. शेतकर्यांना आता वाढीव दराची अपेक्षा आहे. विक्रीपेक्षा साठवणूकीवर शेतकरी भर देत आहेत. दिवाळीनंतर कापसाची खरेदी ही कमी झाली होती तर आता ठप्प असल्याचे चित्र आहे. याचा विपरित परिणाम जिनिंग उद्योगावर होत आहे. राज्यातील जिनिंग उद्योगांना शक्यतो खेडा येथील केंद्रातून कापसाचा पुरवठा होतो. पण ओमिक्रॅानमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पडझड झाली आहे. यातच युरोप आणि अमेरिकेत नाताळाचा माहोल असल्याने कापड, गाठींचा बाजार हा थंड आहे. त्यामुळे जिथे मोठ्या कारखान्यातून ४०० गाठींचे उत्पादन होत होते ते आता २०० वर येऊन ठेपले आहे. या प्रतिकूल परस्थितीमुळे सध्या खेडाची खरेदी ही ठप्प आहे.
हे देखील वाचा :