सीताफळ बागेत असे करावे कीड नियंत्रण; जाणून घ्या सविस्तर

- Advertisement -

लातूर : सीताफळाचा (Custard apple) नैसर्गिक बहर हा खरा जून महिन्यात असतो पण पाण्याची उपलब्धता असल्यास उन्हाळ्याच्या सुरवातीलाही बहर हा धरता येतो. उन्हाळ्याच्या तोंडावर सीताफळाची छाटणी पूर्ण झाली असेल. अशा बागांना कोवळी फूट निर्माण झाली असून नव पालवी फुटली आहे. येथून पुढे बागांची जोपासणा केली तर उत्पादन शेतकर्‍यांच्या पदरी पडणार आहे. यामुळे छाटणी झाल्यावरच अधिकचा धोका असतो त्या दरम्यान योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. शिवाय कीडीचा प्रादुर्भाव झाला तरी योग्य वेळी बंदोबस्त हाच त्यावरचा पर्याय आहे.

कोवळ्या फुटीवर मावा, फुलकिडे, तुडतुडे अशा रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. ही किडे पाने, कोवळ्या फांद्या एवढेच नाही तर कोवळी फळे यातूनही रस शोषतात. यामुळे फुटींची व पानांची वाढ खुंटते शिवाय फळांचा आकार हा वेडावाकडा होतो. फळांची व्यवस्थित वाढ होत नाही परिणामी याचा उत्पादनावर परिणाम होतो.

किडीपासून कसे करावे संरक्षण

सीताफळाच्या बागेतील झाडांची छाटणी पूर्ण झाली की, या झाडांवर लागलीच एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करणे गरजेचे आहे. शिवाय झाडाच्या मुख्य खोडावर जमिनीपासून अडीच फूटावर १ किलो चुना, १ किलो मोरचूद प्रति १० लिटर पाण्यात मिसळून लावावी लागणार आहे. नवीन कोवळ्या फुटीवर मावा, फुलकिडे, तुततुडे यासारख्या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. यामुळे प्रति लिटर पाण्यामध्ये डायमिथोएट २ मिली, मॅन्कोझेब २ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम १ ग्रॅम याचे मिश्रण करुन फवारावे लागणार आहे.

हे पण वाचा :

हे देखील वाचा