नागपूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा ११ वा हप्ता १४ मेपर्यंत योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदा जर वेळेत शेतकर्यांना ११व्या हप्त्याची रक्कम मिळाल्यास खरिप हंगामाच्या पूर्व तयारीसाठी त्याची निश्चितपणे मोठी मदत होवू शकते.
देशभरातील अल्पभूधारक, गरीब शेतकर्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवण्यात येते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकर्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते. हे पैसे थेट संबंधित शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात. ही रक्कम शेतकर्यांना तीन समान हप्त्यात देण्यात येते.
योजनेचा ११ वा हप्ता कधी जमा होणार, याची नेमकी तारीख केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १० वा हप्ता केंद्र सरकारकडून १ जानेवारी २०२२ रोजी जमा करण्यात करण्यात आला होता.