शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे ज्यामुळे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात.
पीएम किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN Samman Nidhi Yojana) अंतर्गत सूचीबद्ध असलेल्या आणि त्याचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने अनिवार्य ईकेवायसी (eKYC) पूर्ण करण्याची तारीख 31 मार्च 2022 ते 22 मे 2022 पर्यंत वाढवली आहे.
पीएम किसान (PM Kisan) वेबसाइटवर एक फ्लॅश येत आहे, ज्यामध्ये सर्व पीएम-किसान लाभार्थींसाठी (PM Kisan Beneficiaries) eKYC ची अंतिम मुदत 22 मे 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ईकेवाईसी (eKYC) अनिवार्य करण्यात आले आहे.
PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, देशातील लहान आणि सीमांत शेतकरी कुटुंबांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. डिजिटल इंडिया उपक्रमासह, सरकारकडून पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपये हस्तांतरित केले जातात. पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये, म्हणजे एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्चमध्ये पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6,000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. ही योजना शेतकऱ्यांच्या आधार तपशीलाशी जोडलेली आहे. डेटाबेसमध्ये शेतकरी आणि कुटुंबांच्या सर्व सदस्यांचा तपशील आहे ज्यांची नावे जमिनीच्या नोंदीमध्ये आढळतात.
eKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया
पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://pmkisan.gov.in/
होमपेजच्या उजव्या बाजूला उपलब्ध असलेल्या eKYC पर्यायावर क्लिक करा.
तुमचा आधार कार्ड नंबर, कॅप्चा कोड टाका आणि सर्च वर क्लिक करा
तुमचा मोबाईल नंबर टाका जो तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे.
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवलेला OTP एंटर करा.
eKYC यशस्वी होण्यासाठी तुमचे सर्व तपशील जुळले पाहिजेत.
तसे नसल्यास, तुम्हाला स्थानिक आधार सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल.
शेतकरी त्यांचे KYC पडताळणी पूर्ण करण्यासाठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊन आणि त्यांचे आधार कार्ड दाखवून eKYC ऑफलाइन पूर्ण करू शकतील.