नवी दिल्ली : पीएम किसान योजनेंतर्गत (PM Kisan Yojna) शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच १० वा हप्ता जमा होणार आहे. मात्र पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकर्यांसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांचे ई केवायसी झालेले नसेल त्यांच्या हप्त्याचे पैसे थांबू शकतात.
ईकेवायसी प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी घरबसल्या मोबाईल किंवा कॉम्प्यूटरवरुन तुम्ही आधीच्या फार्मर कॉर्नर पर्यायाला भेट द्या किंवा जवळच्या सीएससी केंद्राला भेट देऊन आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरण थेट करू शकता.
अशा प्रकारे ऑनलाइन करा ईकेवायसी
– सर्वप्रथम तुम्ही https://pmkisan.gov.in/ या पोर्टलवर जा.
– त्यानंतर तुम्ही फार्मर कॉर्नरवर जा.
– येथे तुम्हाला ई-केवायसीच्या नवीन पर्यायावर क्लिक करावे लागेल.
– तुमच्या समोर एक नवीन पान उघडेल.
– त्यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका आणि नंतर ओटोपी टाका.
– जर सर्व प्रक्रिया पूर्ण झाली, तर ई-केवायसी पूर्ण होईल. प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर स्क्रीनवर इनव्हॅलिड लिहलेले दिसेल.