पुणे : देशाची लोकसंख्या वाढल्याने शेतजमीनही सातत्याने कमी होत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आता शेतीच्या नवीन पर्यायांकडे वळू लागले आहेत. यातील लोकप्रिय पर्याय म्हणजे, पॉली हाऊस/शेड नेट हाऊसचा वापर. या तंत्रज्ञानामुळे फळे व भाजीपाल्याचे भरघोस उत्पादन घेता येणे सहज शक्य झाले आहे. फुलशेतीसाठीही याचा वापर वाढला आहे.
पॉलीहाऊसमध्ये विविध प्रकारच्या भाजीपाला हंगामात पिकांसाठी तेथील वातावरणाशी जुळवून घेत उत्पादन केले जाते. यामध्ये पिकांवर बाह्य वातावरणाचा कोणताही परिणाम होत नाही. याशिवाय शेडनेट हाऊसमध्ये लागवडीसाठी ते पीक निवडले जाते ज्यांना कमी सूर्यप्रकाश लागतो, तसेच जे पीक जास्त तापमानात वाढू शकत नाही. पॉलीहाऊस पूर्णपणे पॉलिथिन सीटने झाकलेले आहे तर शेडनेट हाऊस मच्छरदाणीप्रमाणे जाळीदार असते.
हे देखील वाचा : शेताला कुंपण घालण्यासाठी मिळणार ४८ हजार रुपये
पॉली हाऊस/शेडनेट हाऊस उभारण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत, केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्यांना संरक्षित शेती करण्यासाठी अनुदान देण्यात येते. आज आपण राज्य सरकारच्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृह /शेडनेटगृहातील लागवड साहित्य व मशागत यांकरिता शेतकर्यांना अर्थसहाय्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
शेडनेट हाऊस अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता
१) अत्यल्प व अल्प भूधारक शेतकरी ज्याची एकूण भूधारण २ हेक्टर पर्यंत आहे, तो शेतकरी या घटकांतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र असेल.
२) अल्प/अत्यल्प भूधारक,अनुसूचित जाती जमाती महिला, दिव्यांग व इतर शेतकरी यांना प्राधान्यक्रमानुसार लाभ देण्यात येईल.
३) यापूर्वी सादर घटकांतर्गत इतर शासनाच्या योजनेअंतर्गत लाभ घेतल गेला असल्यास एकत्रित लाभ ४० गुंठ्याच्या मर्यादित घेता येईल.
हे देखील वाचा : शेतीतून लाखोंचे उत्पादन घेण्यासाठी अशा प्रकारे करा शेडनेटगृह तंत्रज्ञानाचा वापर
शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृहासाठी आवश्यक कागदपत्रे
७/१२ उतारा
जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जातीजमाती असल्यास)
८- अ प्रमाणपत्र
शेडनेट हाऊस/ प्लास्टिक टनेल/ हरितगृहासाठी अर्ज कुठे करायचा?
इच्छुक शेतकऱ्यांनी https//dbt.mahapocra.gov.in या संकेतस्थळावर किंवा DBT APP द्वारे ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
शेडनेट हाऊस क्षेत्र मर्यादा
एका लाभार्थ्यास शेडनेटसाठी (राउंड टाईप) कमीत कमी ५०० चौ. मीटर व जास्तीत जास्त ४००० चौ. मीटर क्षेत्र मर्यादा पर्यंत व (फ्लॅट टाईप) साठी कमीत कमी १००० चौ. मीटर व जास्तीत जास्त ४००० चौ. मीटर क्षेत्र मर्यादा पर्यंत लाभ घेता येईल. यापूर्वी कोणताही शासकीय योजने अंतर्गत लाभ घेतला असल्यास सर्व योजना मिळून प्रति लाभार्थी जास्तीत जास्त ४००० चौ. मीटर क्षेत्र मर्यादा पर्यंतच लाभ अनुज्ञेय राहील.
हे देखील वाचा : शेतकऱ्यांनो शेतात लावा नेट हाऊस, उत्पादनात होईल वाढ, सरकारकडूनही मिळेल 50% अनुदान
हरितगृह खर्च व अनुदान
शेडनेट हाऊस मध्ये फ्लॅट टाईप व राउंड टाईप असे दोन प्रकार आहे. सर्वसाधारण क्षेत्रासाठी रु. ७१०/- प्रति चौ मीटर व डोंगराळ क्षेत्रासाठी रु. ८१६ प्रति चौ मीटर याप्रमाणे खर्चाचा मापदंड आहे. यानुसार, ५६० चौ मीटर करीता ५२३६०० रुपये, १००८ चौ मीटर करिता ९४२४८० रुपये, २०१६ चौ. मीटर करिता १७९४२४० रुपये, ३१२० चौ. मीटर करिता २६३३२८० रुपये, तसेच ४००० चौ मीटर करिता ३३७६००० रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यावर शेतकर्यांना ७० टक्के अनुदान मिळाल्यानंतर शासनाकडून २३ लाख रुपये अनुदान म्हणून शेतकर्यांना मिळू शकते.