पुणे : यंदा वेळेआधीचा मान्सूनचे आगमन होण्यासह गतवर्षीप्रमाणे यावेळीही सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणा असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यानच्या काळात मान्सूनपूर्व पावसाने अनेक जिल्ह्यांमध्ये हजेरी लावल्याने पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे. तर काही शेतकर्यांनी पेरण्यांचा देखील शुभारंभ केला आहे. मात्र मान्सूनची वाटचाल मंदावली असल्याने पावसाला उशिर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावलेली नाही, यामुळे या भागांमध्ये खरीप हंगामापूर्वी पेरणीपूर्व कामांवर परिणाम होऊ शकतो.
या महिन्यात प्रायद्वीप आणि ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला असला तरी, मध्य भारतामध्ये आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये फारसा पाऊस झाला नाही. भारतातील जवळपास ६० टक्के जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस शून्य ते अपुरा असल्याने खरिपाच्या पेरणीपूर्व कामांवर याचा परिणाम होणार आहे.
हे देखील वाचा : सांगा कशी करायची शेती? कांद्याचा एकरी खर्च ६० हजार तर उत्पन्न ३० हजार
यातील दिलासादायक बाब म्हणजे, राज्यात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले असून काही भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या आहेत. यंदा सर्वकाही हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे होत असून आता पुढील ३ दिवसांमध्ये कोकण, गोवा आणि विदर्भात पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकर्यांनी पेरणीची घाई करु नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.