अफलजलगढ : हमीभावाच्या कायद्यासह शेतकर्यांच्या विविध मुद्यांवर शब्द फिरवलेल्या केंद्र सरकारविरोधात येत्या १३ मार्चपासून आश्वासनभंग आंदोलन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांनी दिली आहे.
अफजलगढ येथील पत्रकारपरिषदेत टिकैत म्हणाले की, केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी तब्बल वर्षभर शेतकर्यांनी दिल्लीच्या सिमेवर आंदोलन केले होते. केंद्र सरकारने कायदे रद्द केल्यानंतरच शेतकर्यांनी आंदोलन स्थगित केले होते. मात्र, सरकारने त्यावेळी शेतकर्यांच्या अन्य मागण्या मान्य करण्याचे आश्वासनही शेतकर्यांना दिले होते.
यात हमीभावाच्या कायद्यासाठी समिती स्थापन करणे, किसान आंदोलनात सहभागी शेतकर्यांवरील खटले परत घेणे, किसान आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, सरकारी सेवेत संधी, लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा राजीनामा अशा अनेक मागण्या पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिल्यावरच किसान आंदोलन थांबवण्यात आले होते. या आश्वासनांपैकी एकाही आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नसल्याचे टिकैत म्हणाले आहेत.
हे देखील वाचा :