उन्हाळी सोयाबीन पेरा करण्याआधी हे वाचा..

- Advertisement -

खरीप हंगामातील सोयाबीन चा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे, यावर्षी खरीप हंगामातील सोयाबीनला समाधान कारक बाजार भाव प्राप्त झाला असल्याने मोठ्या प्रमाणात उन्हाळी सोयाबीन ची लागवड केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे उन्हाळी सोयाबीन पेरा करण्यासाठी शेतकरी बांधव लगबग करत आहेत तर दुसरीकडे कृषी विभागाने यासंदर्भात शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. कृषी विभागाच्या मते, शेतकरी बांधवांनी उन्हाळी सोयाबीनच्या पेऱ्यासाठी घरचे खात्रीशीर बियाणे वापरावे. बोगस बियाण्यांची पेरणी केली असता शेतकरी बांधवांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, म्हणून सोयाबीन पेरणी करताना बियाण्याची निवड करणे विशेष महत्त्वाचे ठरणार आहे. खरीप हंगामात झालेल्या सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे सध्या विहिरीत मुबलक पाणीसाठा उपलब्‍ध आहे.

सोयाबीन बीजोत्पादनाबाबत जागृती करण्यात आली. यंदा सिंचनासाठी पाण्याची मुबलकता आहे. गतवर्षीच्या चांगल्या अनुभवातून यंदा शेतकरी सोयाबीन बीजोत्पादनाकडे वळले आहेत. पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी या उन्हाळी हंगामात सोयाबीन पिकाला पसंती दर्शवली आहे. कृषी तज्ञांच्या मते, उन्हाळी सोयाबीन पेरणी साठी २० डिसेंबर ते १५ जानेवारी दरम्यानचा काळ उपयुक्त असतो, यादरम्यान उन्हाळी सोयाबीनची पेरणी केल्यास त्यापासून दर्जेदार उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. मात्र, अनेक शेतकरी बेमोसमी सोयाबीनची पेरणी करत आहेत. बेमोसमी सोयाबीनचा हा नवीन प्रयोग असल्याने शेतकरी बांधवांना विशेष काळजी घेणे अपरिहार्य ठरणार आहे.

उन्हाळी सोयाबीनपासून खरिपातील सोयाबीन सारखे दर्जेदार उत्पादन प्राप्त होत नाही, शिवाय उन्हाळी सोयाबीन साठी योग्य तऱ्हेने पाण्याचे व खताचे व्यवस्थापन करावे लागते. पेरणी केल्यापासून ते काढणी करेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. अलीकडे उन्हाळी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जात आहे. एकट्या नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत चार हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीनची पेरणी नमूद करण्यात आले आहे. भविष्यात या एवढ्या मोठ्या क्षेत्रात अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यातील अनेक भागात उन्हाळी सोयाबीन चांगला बहरत असल्याचे चित्र नजरेस पडत आहे. उन्हाळी सोयाबीन बियाण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जात आहे.

चांगल्या बियांनाचा होईल फायदा

उगवण शक्तीची समस्या येऊ शकते. त्यामुळे येत्या खरीप हंगामात पेरणीसाठी घरचे दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली आहे. यंदा आजवर केवळ सोयाबीनच्या क्षेत्राने पाच हजार हेक्टरचा टप्पा पार केला आहे. पेरणी क्षेत्र अजून अंतिम करण्यात आलेले नाही. त्यात बदल होऊ शकतो. उन्हाळी सोयाबीनच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध होऊ शकेल.

हे देखील वाचा :

हे देखील वाचा