नागपूर : विदर्भातील अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याची नवी ओळख ही वनौषधी उत्पादनाचा जिल्हा म्हणून होत आहे. या दोन्ही जिल्ह्याने पानपिंपळी व सफेद मुसळी (Safed Musali) या वनऔषधी उत्पादनात गेल्या काही वर्षात आघाडी घेतली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील या दोन्ही वनौषधींना भौगोलिक मानांकन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्राच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
अमरावती जिल्ह्यातीलगत अंजनगाव सुर्जी तालुक्यात पानपिंपळी लागवडीचा सुमारे 130 वर्षाचा इतिहास आहे. अंजनगाव सुर्जीसह पायथ्याशी असलेल्या अनेक गावांमध्ये पानवेली उत्पादक शेतकरी पानपिंपळी उत्पादन करीत आहेत. एकरी आठ ते 22 क्विंटल वाढलेल्या पानपिंपळीचे उत्पादन होते. कफ पित्तावर उपाय ठरणाऱ्या औषधीमध्ये याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. अंजनगाव सुर्जीमधून व्यापारी पानपिंपळीची खरेदी करतात त्याला सुमारे 450 ते 500 रुपये किलो दर मिळतो.
पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविध केंद्राच्या माध्यमातून बोर्डी, अंजनगाव सुर्जी भागात होणार्या पानपिंपळी तसेच जळगाव जामोद भागातील सफेद मुसळीला भौगोलिक मानांकनाचा प्रस्ताव असल्याचे केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. दिगांबर मोकाट यांनी सांगितले आहे.
हे देखील वाचा :