चढ-उतारानंतर सोयाबीनचे भाव स्थिर 

- Advertisement -

सोयाबीनच्या दरात सुरू असलेली अस्थिरता संपली आहे. किंमती स्थिर झाल्या आहेत. उत्पादनात घट होऊनही या हंगामाच्या अखेरीस बाजारात केवळ सोयाबीन पिकाचीच चर्चा होती. मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी घसरण झाली आणि त्यानंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी किमतीत सुधारणा झाली. यानंतर सोयाबीन विक्रीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती सलग दोन दिवस बंद होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसांत सोयाबीनचे दर 7350 ते 7400 रुपयांवर स्थिरावले असले तरी सोयाबीनच्या विक्रीबाबत शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न कायम आहे. बाजारात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्याचबरोबर सोयाबीनचे भाव आणखी वाढतील, त्यामुळे शेतकऱ्यांनी नीट विचार करूनच सोयाबीनची विक्री करावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञ शेतकऱ्यांना देत आहेत.

सोयाबीनच्या दराच्या बाबतीत गेल्या पंधरा दिवसांत जे घडले ते संपूर्ण हंगामात झाले नाही. सोयाबीनची मागणी आणि युद्धामुळे भाव विक्रमी दराने वाढले. त्यामुळे अधूनमधून अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र गेल्या दोन दिवसांत दर स्थिर आहेत. दर स्थिर राहिल्यास महसुलात वाढ होईल

राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार सोयाबीनला सर्वाधिक कमाल 7510 रुपयांचा भाव मिळाला. हा भाव हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती इथं. पिवळ्या सोयाबीनला मिळाला असून हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये पिवळ्या सोयाबीनची पंधराशे 47 क्विंटल आवक झाली. याकरिता किमान भाव 6600 कमाल भाव 7510 आणि सर्वसाधारण भाव सात हजार पंधरा रुपये का मिळाला आहे. त्याखालोखाल देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार 500 रुपयांचा भाव मिळाला. गंगाखेड ,जालना आणि वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार 400 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे.

दिनांक 25 मार्च रोजी मिळालेल्या बाजारभावाच्या तुलनेत आज दिनांक 30 मार्च रोजी मिळालेले भाव हे अधिक आहेत. सध्याचे सोयाबीन बाजार भाव बघता हे बाजार भाव सात हजारांवर स्थिरावलेले दिसत आहेत. त्यामुळे त्याच दरात विक्री करावी की अजून वाढीव दराची वाट पहावी या संभ्रमात सध्या शेतकरी राजा आहे. त्यामुळे अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणुकीचा निर्णय घेतला आहे. आता खरिपाची लगबग लवकरच सुरू होईल असं असताना शेतकऱ्यांनी वाढीव दरासाठी काय पण अशी भूमिका घेतली आहे.

यापुढेही सोयाबीनच्या दरात बदल होणार का?

यावर्षी शेतकर्‍यांनी सोयाबीनची लगेच विक्री केली नाही. योग्य दर मिळाल्याशिवाय सोयाबीनची विक्री न करण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात फायदेशीर ठरत आहे. हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनचा भाव 4,800 रुपये होता, मात्र आज तो 7,400 रुपये झाला आहे. पुढे जाऊन किमती स्थिर राहण्याची अपेक्षा आहे, परंतु युद्धाची परिस्थिती सुधारल्यास आणि उन्हाळ्यात सोयाबीन बाजारात आल्यास, किमती कमी होऊ शकतात.

सोयाबीनबरोबरच हरभऱ्याचीही आवक वाढली

सध्या हरभरा पीक काढणीचे कामही सुरू आहे. हमीभावापेक्षा कमी दर असूनही यावेळी हरभऱ्याची भरघोस आवक होत आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी हरभऱ्याचा सरासरी दर 4730 रुपये होता, तर हमीभाव केंद्रावर हा दर 5230 आहे. दरम्यान, शनिवारी मोठ्या प्रमाणात शेतकरी हरभरा घेऊन मंडईत पोहोचत आहेत. सोयाबीनबरोबरच आता हरभऱ्यालाही योग्य भाव मिळणे अपेक्षित असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हे देखील वाचा