नाशिक : पीककर्जाची रक्कम खरीप पेरणी सुरु होण्यापूर्वीच शेतकर्यांच्या खात्यात जमा झाल्यास त्याचा शेतकर्यांना फायदा होवू शकतो. यंदा राज्याचा अर्थसंकल्प सादर करतांना मे महिन्याच्या १ तारखेपासूनच पीककर्ज वितरणाचे आदेश संबंधित बँकांना देण्यात आले आहेत. त्यासाठी राज्य शासनाने धोरणांमध्ये देखील बदल केला असून याचा मोठा फायदा खरिप हंगामात होवू शकतो.
शेतकर्यांना शेतीच्या मशागतीसाठी पीककर्जाची गरज भासते. जिल्ह्यातील प्रत्येक गरजू व पात्र शेतकर्याला विहित वेळेत पीककर्ज उपलब्ध होईल, यादृष्टीने संबंधित विभागांनी कर्ज वाटपाचे नियोजन करावे. पीक कर्जासंदर्भात विविध बँकांसोबत समन्वय साधुन त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट पुर्ण होईल, यासाठी पाठपुरावा करण्यात यावा.
ज्या बँकां त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट पुर्ण करणार नाहीत, अशा बँकांमधील शासकीय ठेवी तातडीने काढून घेण्यात याव्यात व या बँकांची तक्रार रिझर्व्ह बँकेकडे करण्यात यावी. शेतकर्यांच्या शेतीपंपाला वीज जोडणीही वेळेत मिळेल यासाठीही आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सुचनाही मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.