थंडीमध्ये जनावरांना होणार्‍या ५ आजारांची अशी घ्या काळजी

- Advertisement -

मुंबई : थंडीमध्ये जनावरांना लाळ्या, खुरकूत, न्यूमोनिया, अतिसार यासारख्या आजारांचा धोका असतो. या आजारांपासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांचा अवलंब करावा लागणार आहे. थंडीपासून सुरक्षेसह त्यांच्या आहारावर विशेष लक्ष केंद्रीत केल्यास शेतकर्‍यांचे पशुधन सुरक्षित राहते.

न्यूमोनिया टाळण्यासाठी जनावराचे थंड हवेपासून संरक्षण करणे हाच योग्य पर्याय आहे. दिवसभर ऊन आणि सकाळ-संध्याकाळ थंड वातावरण असेल तर मग अशावेळी त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे.

अशा पध्दतीने घ्या पशुधनाची काळजी

१) थंडीत जनावरांना मोकळ्या जागेत न बांधता गोठ्यात बांधालयला हवे. तशी व्यवस्था शेतकर्‍यांकडून नाही झाली तर किमान त्यांच्या अंगावर ऊबदार ब्लँकेट, कपडा किंवा पोते टाकावे.
२) रात्रीच्या वेळी जनावरांना फरशी बांधणार असताल त्याखाली गवत टाकणे गरजेचे आहे. जेणेकरुन ऊबदारपणा निर्माण होईल.
३) थंडीपासून वाचवण्यासाठी संतुलित आहार देणे अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून जनावरांना ऊर्जा मिळू शकेल. जनावरांच्या संतुलित आहारात हिरवा चारा, खनिज मिश्रण यांसारख्या गोष्टींचा समावेश असायला हवा.
४) पशुवैद्यक संतुलित आहार तसेच तेल पाजण्याची शिफारस करतात. तथापि, आपण फक्त अधिक दुधाळ प्राण्यांना तेल देऊ शकता. लाळ्या- खुरकूत आलेल्या जनावरांना तेल देणे हे धोक्याचे आहे. त्यामुळे इतर आजारांमध्ये वाढ होणार आहे. याचा सामना करण्यासाठी प्राण्यांना वेळेवर लस दिली पाहिजे.
५) अतिसारासाठी जनावरांना हिमालयातील बतिसा पावडर ही जनावरांच्या खाद्यामध्ये दिली तरी चालणार आहे. यामुळे त्याची पचनसंस्था मजबूत राहते.

हे देखील वाचा