१) फळे नाजूक आणि हिरव्या रंगाची असावीत.
२) फळे रोग व किडीच्या प्रादुर्भावापासून मुक्त असावीत.
३) खराब किंबा डाग पडलेली आणि पिवळी फळे निवडून वेगळी करावित.
४) फळांची प्रतवारी करुनच निर्यातीसाठी पाठवावीत.
५) फळांच्या पॅकिंगसाठी ज्यूटच्या धाग्यापासून तयार केलेल्या मोठ्या आकाराच्या पिशव्यांचा वापर करावा. जेणेकरुन हवा खेळती राहील.
६) टिश्यू पेपरचा वापर फळे गुडांळण्यासाठी करावा. जेणेकरुन बाष्पीभवन कमी करुन टिकण्याचा कालावधी वाढविण्यासाठी उपयोग होतो.
७) फळे तोडणीच्यावेळी शक्यतो थंड वातावरण असावे. तसेच तापामान ७-१० अंश सें.ग्रे. आणि आर्द्रता ९०-९५ टक्के असावी.
८) पॅकिंगसाठी टिश्यू पेपरचा वापर करावा. त्यानंतर करोगेटेड ’फायबर बोर्ड बॉक्स वापरावेत.
९) निर्यातीवेळी जास्तीत जास्त थंड हवा खेळती राहील, याचा विचार करावा.
१०) निर्यातीसाठी फळे पाठविण्यासाठी फळांवर कीटकनाशकाचे किंवा बुरशीनाशकाचे अवशेष हे एम.आर.लेव्हल पेक्षा जास्त नसावेत.
११) भाजीपाला पिकामध्ये ज्या बुरशीनाशकांच्या किंबा किटकनाशकांच्या वापरास बंदी घातळी आहे, अशी औषधे फवारणीसाठी वापरु नयेत.