नगर : राज्यातील अहमदनगर, जळगाव, धुळे, अकोला पाठोपाठ आता वाशिम जिल्ह्यामध्येही जनावरांना लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याअनुशंगाने पशुसंवर्धन विभागाकडून उपापययोजना राबवण्यास सुरवात झाली आहे. मात्र, ‘लम्पी’ हा संसर्गजन्य रोग असल्याने कमी कालावधीत अधिक जनावरांना त्याची लागण होते. यामुळे जनावरे दगावली जात नाही पण रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून योग्य ती उपाययोजना ही गरजेची आहे.
लम्पी हा एक त्वचा रोग असून त्याचा संसर्ग झपाट्याने होतो. जनावरांना लम्पी रोग होण्याचे कारणही तसेच आहे. जनावरांच्या गोठ्यातील गोचिड, माश्या, टिक्स यांच्या मार्फत या लम्पी आजाराची लागण होते. यामुळे जनावरास ताप येतो तर जनावराच्या डोके, मान, पाय, छाती, पाठ, कास येथील त्वचेवर ते ५ से.मी. व्यासाच्या गाठी येतात. जनावराची तहान-भूक कमी होऊन दुध उत्पादनावरही त्याचा परिणाम होतो.
अशी करा उपयायोजना
लम्पी रोगाचा प्रादुर्भाव होऊच नये यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा. गोठ्यामध्ये माशा, गोमाश्या, गोचिड हे वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी. शेतकर्यांनी जनावराच्या गोठ्यात २० टक्के इथर व क्लोरोफार्म, १ टक्के फॉर्मलिन, २ टक्के फिनॉल, आयोडिन जंतनाशके १:३ प्रमाणात पाण्यामध्ये मिसळून फवारणी करण्यात यावी असल्या सूचना पशूसंवर्धन विभागाने दिलेल्या आहेत. मंडळाच्या ठिकाणच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात लम्पी या संसर्गज्यन आजारावरील लस मोफत उपलब्ध आहे. यामुळे जनावरांचे तातडीने लसीकरण करुन घ्यावे. एखाद्या जनावरास हा आजार झाल्यास सुमारे ५ किमीपर्यंत लसीकरण मोहिम राबवणे आवश्यक असल्याने शेतकर्यांनी तातडीने पशूसंवर्धन विभागाला याची माहिती द्यावी.