बुलाडाणा : बुलढाणा जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असली तरी शेतकर्यांसमोरील समस्या ह्या कायम आहेत. रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. पावसामुळे सोयाबीन, उडीद, मूग या खरिपातील पिकांमध्ये तण वाढत आहे. त्याचा परिणाम पिकांवर होत असल्याने पीक फवारणीसाठी अधिकचा खर्च करावा लागणार आहे.
बुलाडाणा जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन हेच मुख्य पीक आहे. शिवाय यंदा कडधान्याच्या पेरणीला उशिर झाल्याने शेतकर्यांनी सोयाबीनवरच भर दिला आहे. असे असताना आता ढगाळ वातावरणामुळे पिकावर अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. पिकांची जोपासणा केली तरच भविष्यात उत्पादनात वाढ होणार आहे. त्यामुळे अधिकचा खर्च करुन पीक जोपासण्यावर शेतकरी भर देत आहे.
अळीवर असे मिळवा नियंत्रण
फवारणी करण्यापूर्वी शेतकर्यांनी आगोदर पिकांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. पिकांच्या नुकसानीची पातळी पाहताना ४ लहान अळ्या प्रतिमिटर ओळीत आढळल्यास शिफारसीत कीटकनाशकांचा वापर करावा. यामध्ये प्रोफेनोफॉस २० मिली किंवा ्रक्लोरोअॅल्ट्रानिलीप्रोल ३ मिली किंवा इन्डोक्साकार्ब ६.६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून नॅसपॅक पंपाने फवारणी करावी, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.