तापमान ४२ अंशावर पोहोचल्याने केळीच्या फळबागा करपल्या

- Advertisement -

जळगाव : जळगाव जिल्ह्याचे तापमान ४२ ते ४४ अंशापर्यंत पोहचले आहे. गेल्या चार दिवसांपासून निर्माण झालेल्या उष्णतेच्या लाटेचा उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे वाढणारे तापमान केळी उत्पादकांसाठी तापदायक ठरत आहे. जळगाव जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी प्रमाणा बाहेर उष्णता असल्याने पीकांना वारंवार पाणी देणं शेतकर्‍यांना शक्य नसते. त्यामुळे काढणीला आलेली अनेक पीके करपून जाण्याची भीती शेतकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे.

गेल्या वर्षभरात निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका केळी पिकाला बसला आहे. कधी अवकाळी तर कधी कडाक्याची थंडीचा सामना करत कसेबसे वाचविले पीकं आता उष्णतेच्या लाटेपासून कसे वाचवायचे? असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे. सुर्य आग ओकत असल्याने केळीबागा करपून जात आहे. केळीची पाने जागेवरच जळून जात आहेत. त्यामुळे वाढीव उत्पन्न तर सोडाच पण या बागा जोपासायच्या कशा? असा प्रश्‍न शेतकर्‍यांना सतावत आहे.

वर्षभर सरासरी एवढाही दर नाही

केळी हे बारमाही घेतले जाणारे पीक असले तरी गेल्या वर्षभरात समाधानकारक दर मिळालेला नाही. अवकाळीमुळे उत्पादनात घट झाली पण मागणीच नसल्याने चढे दर शेतकर्‍यांना मिळाले नाही. अवकाळीनंतर थंडीमध्येही केळीला मागणी राहिली नाही. याऊलट अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे करपा, खोडकिड या रोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे पदरुन पैसे खर्चून शेतकर्‍यांना बागा जोपासाव्या लागल्या होत्या. आता रमजानच्या महिन्यात केळीला अधिकचा दर मिळेल अशी आशा होती मात्र त्यावर देखील पाणी फिरले आहे.

हे पण वाचा :

हे देखील वाचा