मुंबई : शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अलीकडच्या काळात झपाट्याने वाढत आहे. यात आता एका मोठ्या खेळाडूची एट्रीं झाली आहे. बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि सीडीसी ग्रुपसह अनेक मोठ्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक असलेले भारतीय स्टार्टअप क्रॉपिन क्लाउडने कृषी उद्योगाचे डिजिटलायझेशन करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. कंपनीने क्रॉपिन क्लाउड, एकात्मिक अॅप्ससह क्लाउड प्लॅटफॉर्म लॉन्च करण्याची घोषणा केली. २०१० मध्ये सुरु झालेल्या, क्रॉपिनची इतर उत्पादने ९२ देशांमध्ये लाइव्ह आहेत, ती २५० पेक्षा जास्त बीटूबी ग्राहकांसह भागीदारी केली आहे आणि तिने २६ दशलक्ष एकर शेतजमीन डिजीटल केले आहे.
क्रॉपिन डेटा हब, विश्लेषणासाठी विविध स्त्रोतांकडून डेटा गोळा करते, ज्यामध्ये शेतातील शेत व्यवस्थापन अॅप्स, आयओटी उपकरणे, ड्रोन, रिमोट सेन्सिंग उपग्रह आणि हवामान अहवाल यांचा समावेश आहे. क्रॉपिन इंटेलिजन्स कंपनीच्या २२ संदर्भित सखोल-शिक्षण आणि एआय मॉडेल्सचा वापर कृषी व्यवसायांना पीक शोध, पीक अवस्थेची ओळख, उत्पन्न अंदाज, सिंचन वेळापत्रक, कीड आणि रोग अंदाज, नायट्रोजनचे सेवन आणि कापणी तारखेचा अंदाज यांसारख्या डेटा पॉइंट्ससह मदत करण्यासाठी करते.
२४४ गावे, ३०,००० शेतजमिनी आणि ७७ पीक वाणांचा समावेश असलेल्या प्रकल्पात क्रॉपिनने जागतिक बँक आणि भारत सरकारला हवामान, पीक व्यवस्थापन, कीड आणि रोगांचा अंदाज, पोषक व्यवस्थापन आणि माती आणि पाणी व्यवस्थापन पद्धतींबद्दल दिशा दाखविण्याचे काम केले आहे. बंगलोरमध्ये मुख्यालय असलेल्या, क्रॉपिनच्या युनायटेड स्टेट्स, सिंगापूर आणि नेदरलँड्समध्ये उपकंपन्या आहेत.