शेतशिवार । पुणे : कोरोनानंतर निसर्गाच्या प्रकोपामुळे बळीराजासमोर नवनवीन संकट उभी राहत आहेत. राज्यात अचानक अवकाळीचे संकट आल्याने शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. कापूस वेचणी सुरू असतानाच जर पाऊस पडला तर कापसाचे बोंड ओलीहोतील. याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे. तसेच अनेक भागात कांदा काढणीसाठी आला आहे तर, काही ठिकाणी कांदा शेतात काढून ठेवण्यात आला आहे.
दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. यामुळे पुढील २ दिवस राज्यांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली होती. त्यामुळे पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड अशा विविध ठिकाणी पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे.