शेतशिवार । पुणे : हवामान खात्याने कालच दिलेल्या सूचनेनुसार राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाले असून अनेक भागात विजांसह पावसाची दाट शक्यता आहे. यामुळे हवामान खात्याने कालच येलो अलर्ट जरी केला होता.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पत्ता तयार झाला होता. आता त्यात भर म्हणून दक्षिण अंदमान समुद्र आणि थायलंडच्या लगतच्या किनारपट्टीवर देखील कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या सर्वांचे परिणाम चक्रीवादळात होऊ शकण्याची शक्यता असल्याने पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील ४ ते ५ दिवसदक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रात विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे.
राज्यात होत असलेल्या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने थंडी गायब झाली आहे. रविवारी (ता. १४) सकाळी निफाड येथेसर्वात कमी १६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर सांताक्रूझ येथे सर्वाधिक ३५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. उर्वरित राज्यात पारा १७ अंशांच्या पुढे गेला आहे.