शेत शिवार । Today Weather Updates गेल्या काही दिवसात गायब झालेली थंडी पुन्हा आता जोर धरत आहे. विदर्भ, मराठवाड्यसह राज्यातील अनेक भागात किमान तापमानात मोठी घाट झाली आहे. येत्या २ ते ३ दिवसात या तापमानात अजून ओठी घाट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील २-३ दिवस तापमान आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. आज नागपूर येथे १२. ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर नांदेड , परभणीत देखील १४ अंश किमान तपमान आहे . तसेच आज राज्याच्या इतर भागात सरासरी तापमान १४-१६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.
महाराष्ट्र तापमान १६ डिसेंबर,
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 16, 2021
विदर्भात तापमान खाली…हिवाळ्याची चाहूल..
नागपूर १२.४°C
संलग्न मराठवाडा भागात ही तापमान खाली…
नांदेड, परभणी ~१४°C आसपास
राज्यात इतर भागात किमान तापमान १४-१६°C.
IMD च्या पुर्वानुमाना नुसार येत्या 2,3 दिवसात तापमान अजून खाली ची शक्यता. pic.twitter.com/2jhVHeb5d2