शेत शिवार । पुणे : Today Weather Updates राज्यात मागील काही दिवसांमध्ये थंडीची जोरदार लाट आली आहे. आज राज्यामध्ये धुळे आणि नागपुरात सर्वात कमी तापनाची नोंद झाली आहे. धुळे जिल्ह्यातील तापमान आज 7 अंश सेल्सिअस तर नागपूर जिल्ह्यातील तापमान ७.८ अंश सेल्सिअस इतके आहे. पुढील 48 तास राज्यातील थंडीचा जोर कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
पुढील 48 तासांत उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचा जोर वाढणार आहे. 21 डिसेंबरच्या सकाळपर्यंत राज्यातील अनेक भागात किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
राज्यातील मुख्य शहरांमधील तापमान खालील प्रमाणे :
निफाड किमान तापमान – 10
नागपूर किमान तापमान 13.4
नाशिक – 12.5
वाशिम -13
बुलढाणा 11.2
परभणी 10.06
जळगाव किमान तापमान 11.3
हे देखील वाचा :