नाशिक : रब्बी हंगामातील पीक काढणीची लगबग सुरु झाली आहे. असे असतानाच पुन्हा राज्यभर अवकाळी पाऊसाचे संकट उभे राहिले आहे. आठवडाभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली तर बहुतांश जिल्ह्यांमध्ये अद्यापही ढगाळ वातावरण आहे.
राज्यात दक्षिण कोकण म्हणजेच ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पाऊस बरसणार आहे तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि विदर्भात अवकाळीची अवकृपा राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. म्हणजेच पुन्हा एकदा कोकणातील आंबा फळपिकावरच या अवकाळीचा परिणाम होणार आहे.
त्यामुळे पिकांचे तर नुकसान होणार आहे पण काढणी झालेल्या शेतीमालही काळवंडण्याचा धोका आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या आंब्याची गळ होण्याचा धोका आहे. किमान तीन ते चार दिवस हे पावसाचेच असणार आहेत. एवढेच नाही तर मेघ गर्जनेसह पाऊस बरसणार असल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. महिन्याभरापासून होत असलेल्या वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम हा आंबा फळपिकावर झाल्याचे दिसून येत आहे.
आतापर्यंत झालेल्या अवकाळी पावसामुळे उत्पादनात तर घट झालीच होती पण कोकणात आंबा गळतीचा सर्वाधिक धोका झाला आहे. मध्यंतरी अवकाळी त्यानंतर वाढत्या उन्हाच्या झळा आणि आता पुन्हा अवकाळाचे सावट त्यामुळे शेवटच्या हंगामातील आंबा शेतकर्यांच्या पदरी पडणार की नाही अशी अवस्था झाली आहे.
हे देखील वाचा :