जळगाव : रब्बी हंगामात महाराष्ट्रात ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ज्वारीचे पीक अन्नधान्य व कडब्याचा जनावरांना चारा मिळावा म्हणून घेतले जाते. ज्वारी हे कमीत कमी निविष्ठांसह, वेगवेगळ्या परिस्थितीत, सर्व हंगामात घेता येणारे पीक आहे. रब्बी ज्वारी लागवडीसाठी मध्यम ते भारी, जास्त जलधारणा क्षमता असलेल्या जमिनीची निवड करावी. चांगल्या निचर्याची व ओलावा धरुन ठेवणारी जमीन उत्तम असते. जमीनीत पाणी साचून राहिल्यास पिकाच्या वाढीवर विपरित परिणाम होतो. जमिनीचा सामू ५.५ ते ८.५ असल्यास पीक चांगले होते. रब्बी हंगामासाठी पेरणी-१५ सप्टेंबर ते१५ ऑक्टोबर व उन्हाळी हंगामासाठी-१० ते १५ जानेवारी दरम्यान योग्य काळ असतो.
अशी करा पुर्वमशागत व बियाणे प्रक्रिया
खरीपातील पीके निघाल्यानंतर जमीनीची उभी आडवी नांगरट करावी व वखराच्या पाळया देउन जमीन भुसभुशीत करावी. हेक्टरी १० ते १५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरवून पुन्हा वखराची शेवटची पाळी द्यावी. त्यानंतर जमिनीच्या उताराप्रमाणे योग्य आकाराचे सपाट वाफे तयार करावेत.
त्यानंतर ७.५ ते १० किलो प्रति हेक्टर बियाणे पुरेसे आहे. पेरणीसाठी दोन चाड्याच्या तिफणीचा उपयोग करावा. जेणेकरुन पेरणीसोबत खते देणे सोईचे होईल. प्रति किलो बियाण्यास १.४ मीली इमीडाक्लोप्रीड अधिक २ ग्रॅम कार्बेनडाझीम (बावीस्टीन)ची बिजप्रक्रिया करावी किंवा थायमेथॅक्झान ३.० ग्रॅम प्रती किलो बियाण्याला वापरावे.
रासायनिक खते
कोरडवाहू रब्बी ज्वारीकरीता ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद २५ किलो पालाश हेक्टरी या मात्रेची शिफारस केलेली आहे. खताची संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळीच द्यावी. ओलीताखाली रब्बी ज्वारीकरीता ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, ४० किलो पालाश हेक्टरी द्यावे. यापैकी ४० किलो
नत्र व संपूर्ण स्फूरद व पालाश पेरणीसोबतच द्यावे व उरलेली ४० किलो नत्राची मात्रा पीक २५ ते ३० दिवसाचे असताना द्यावी.
किड / रोग नियंत्रण
फोरेट १० टक्के दाणेदार १० कि.प्रति हेक्टरी या प्रमाणात पेरणीच्या वेळी जमिनीतून द्यावे.
किडीच्या व्यवस्थापनासाठी ऑक्सीडेमेटॉन मिथिल २५ टक्के प्रवाही प्रती १० लिटर या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.
फोरेट १० टक्के दाणेदार १० कि.प्रती हेक्टरी पेरणीच्या वेळी जमिनीतून द्यावे.
कार्बारिल ५० टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.
तुडतुडे कार्बारिल ५० टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.