• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

शेततळ्यातील मत्स्यपालनातून लाखों रुपये कमवायचेय? मग हे वाचाच

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in बातम्या
November 2, 2022 | 3:24 pm
fish

सातारा : अनेक शेतकरी आता शेततळ्यांमध्ये मत्स्यपालनचा प्रयोग करु लागले आहेत. मत्स्यपालन करतांना त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्या बाबींकडे प्राधान्याने लक्ष देण्याची आवश्यकता असते. याची तंत्रशुध्द माहिती शेतकर्‍यांना नसते. यामुळे मत्स्यपालन करतांना तळ्याचा आकारकेवढा असावा?, मत्स्यशेतीकरिता नैसर्गिक तळे निवडायचे असेल तर त्यासाठी कोणत्या बाबी विचारात घ्याव्यात?, तळ्यात मासळीची पिल्ले केवढ्या आकाराची सोडावीत?, तळ्यातील माशांचे नैसर्गिक खाद्य कोणते असते व जास्तीचे खाद्य द्यावे लागते का?. माशांची काळजी कशी घ्यावी? याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

जलद वाढ व मोठा आकार होणार्‍या पाण्याच्या विविध थरांतील अन्नाचा वापर करू शकणार्‍या कटला, रोहू, मृगळ या जाती मत्स्यशेतीसाठी मुख्यतः वापरतात. या जातीव्यतिरिक्त चंदेरा (सिल्व्हर कार्प), गवत्या (ग्रासकार्प) ब देशी मागूर् या जातीचे मासे. तसेच गोड्या पाण्यातील झिंगे (मॅक्रोबँकियम रोझेनबर्गी) मत्स्यशेतीसाठी विशिष्ट प्रकारच्या तळ्यात व विशिष्ट परिस्थितीत योग्य ठरतात.

निवडक जातीची मत्स्य बोटुकली दर एकरी जलविस्तारास ५००० नग सोडावीत. योग्य खाद्य, पाणी इ. व्यवस्थापन असल्यास एकरी १० ते १५ हजार मत्स्य बोटूकली सोडू शकतो. बोटुकल्यांची लांबी ५० ते १०० मि.मी. असावी. कटला, रोहू, मृगळ जातीचे बीज साधारणतः जुले ते ऑगस्ट अखेरपर्यंत व सायप्रिनसचे बीज जानेवारी ते मार्चपर्यंत शासनाच्या मत्स्यबीज केंद्रावर विकत मिळते.

शेंगदाण्याची पेंड व भाताचा कणीकोंडा यांचे समभाग मिश्रण पूरक खाद्याच्या या स्वरूपात माशांना खाऊ घालतात. या मिश्रणात पशुखाद्यात वापरले जाणारे विविध खनिजांचे मिश्रण मिसळून वापरल्यास त्यापासून इतर दुर्मीळ पोषकद्रव्येही मिळू शकतात व माशांची वाढ चांगली होते. तसेच बाजारात विविध घटकांचे योग्य मिश्रणाचे मासळीची प्रजातीनुरूप व मासळीच्या तोंडाच्या आकारानुसार खाद्य बाजारात उपलब्ध आहेत.

कृत्रिम किंवा नैसर्गिक शेततळे
तळ्याचा जलविस्तार ०.४ हेक्टर (४००० चौ.मी.) पासून २ हेक्टरपर्यंत कितीही चालेल; परंतु ०.४० ते ०.५० हेक्टरपर्यंतचे तळे अधिक सोयस्कर पडते. पाण्याच्या पातळीवरील मोजमापाप्रमाणे लांबी -रुंदीचे प्रमाण शक्यतो २:१ असावे. या तळ्यांच्या शेजारी किंबा त्या तळ्यांच्या पात्रातच मत्स्यबीजाचे संगोपन करण्याकरिता एक लहान संगोपन तळेही बांधावं. या संगोपन तळ्याचे जलक्षेत्र मत्स्थशेतीकरिता बांधलेल्या तळ्याच्या तुलनेत २ टक्के असावे. मत्स्यशेतीकरिता नैसर्गिक तळे निवडायचे असेल तर सरासरी १० हेक्टर जलक्षेत्र असलेली बारमाही तळी मत्स्यशेतीसाठी सर्वात उपयुक्त असतात. त्याहून मोठ्या तलावामध्ये फक्त योग्य जातीच्या माशांची बोटुकली वाजवी प्रमाणात सोडणे व तलावामधून उपद्रवी माशांचा शक्यतो नायनाट करणे एवढ्याच प्रमाणात मत्स्यशेतीचे प्रयत्न मर्यादित राहतात.

प्लास्टिक पेपर तलाव (प्लास्टिक लाईनर)
ज्या ठिकाणांची जागा खरकाड/मुरमाड मत्स्यपालनांस योग्य नाही किंवा पाणी धरून ठेवण्याची क्षमता नाही अशा मत्स्यतलावात पाणी पाझराचे प्रमाण कमी करण्यासाठी सिमेंट, दगड, विटाचे अस्तर किंवा प्लास्टिक फिल्मचा वापर केला जातो. प्लास्टिक पेपर जाडी साधारणत: ५०० ते ६५० जीएसएम पर्यंत वापरली जाते. सदर तलावांत पाणी काढणे, भरणे व मासे पकडण्यास सोपे असते. या प्रकारात जमिनीचा/मातीचा संपर्क नसल्यामुळे नैसर्गिकरित्या होणार्‍या जैविक, रासायनिक विघटन प्रक्रिया इ. होत नाहीत. या प्रकारात मासळीला आवश्यक प्रमाणात पूरक खाद्य वेळोवेळी द्यावे लागते. सदर खाद्याचे सेवन करून मासळीची तलावांत विष्ठा वाढते व त्यामुळे पाण्यातील अमोनिया इ. घटक वाढतात वब पाण्याची प्रत लवकर खराब होते. या प्रकारात वेळोवेळी पाणी बदलणे आवश्यक असते.

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
Coriander-farming

कोथिंबीरच्या बंपर उत्पादनासाठी अशा पध्दतीने करा लागवड

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट