पुणे : राज्यात कमाल तापमानाचा पारा पस्तिशी पार गेला आहे. परिणामी, उन्हाचा चटका अधिकच वाढल्याने त्रासदायक ठरत असून, उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यातच बहुतांशी ठिकाणी किमान तापमानही १३ अंशांच्या वर गेल्याने गारठा कमी झाला आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून, किमान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
आठवडाभरात सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांगली, नगर, कोल्हापूर, अकोला येथे ३५ अंशांपेक्षा अधिक, तर सातारा, जळगाव, पुणे, परभणी, वर्धा येथे ३४ अंश व त्यापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.
हे देखील वाचा :