दूधाचे दर वाढणार? नेमके काय आहे कारण, वाचा सविस्तर

- Advertisement -

मुंबई : दूध उत्पादन खर्चात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने त्याचा परिणाम दूधाच्या दरावर देखील पडण्याची शक्यता आहे. दरवर्षी पोषक वातावरणामुळे नोव्हेंबर ते मार्च या दरम्यानच्या कालावधीत दूध उत्पादनात वाढ होत असते. यंदाही ती झाली आहे मात्र, दुसरीकडे चार्‍याच्या किंमती वाढत आहेत. पशूखाद्याचे दर तेजीत आहेत. चार्‍याच्या किंमतीतही वाढ झाली आहे. यामुळे येत्या काही दिवसात दूधाचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे.

उत्पादनाच्या तुलनेत चार्‍याच्या किंमती वाढल्या आहेत. पशूखाद्यामध्ये गेल्या वर्षभरात ५० ते ६० टक्क्यांनी वाढ झालेली आहे. दूध उत्पादनावरील खर्च तर वाढलाच आहे पण त्याचा पुरवठाही नियमित होत नसल्याने आता दूधाच्या दरवाढीशिवाय पर्याय नसल्याचे मत दूग्धतज्ञांकडून वर्तविण्यात आला आहे.

हे देखील वाचा