मुंबई: नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत ५० रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात येणार असून, या प्रोत्साहन योजनेअंतर्गत राज्यातील ८ लाख शेतकर्यांच्या थेट खात्यावर ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम गुरुवारी जमा होणार आहे. तर दुसर्या टप्प्यात आणखी काही शेतकर्यांना याचा लाभ मिळणार आहे. दुसरा टप्पा पुढील १० दिवसांत सुरू होणार आहे.
कर्जाचे नियमित हप्ते भरतात त्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये इतका भत्ता देण्याची घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानंतर करोनाच्या सावटामुळे राज्याच्या महसुलात घट आणि प्रशासकीय कामाकाजावरील विपरीत परिणाम यामुळे या योजनेची अंमलबजावणी झाली नाही. सहकार विभागाने स्टेट बँकेला समन्वयक बँक म्हणून नेमले आहे. या प्रोत्साहन योजनेत थेट शेतकर्यांच्या खात्यावर २५०० कोटी इतका निधी वर्ग केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ८ लाख शेतकर्यांना याचा लाभ होणार आहे.