पुणे : कृषी क्षेत्रात इस्त्रायली तंत्रज्ञानाची हात कुणीच पकडू शकत नाही. पाण्याचे दुर्भीक्ष असतांनाही ठिबकसह अन्य अत्याधुनिक तंत्रज्ञानाने इस्त्रायलने आधुनिक शेती कशी करावी? याचे नवे मापदंड तयार केले आहेत. आता यांत्रिकरणानंतर इस्त्रायलने आर्टिफिशयल इन्टिलिजन्स (एआय)चा वापर करत आधुनिक शेतीत पुढचे पाऊल ठेवले आहे. यात इस्त्रायलच्या अॅग्रीटेक स्टार्टअपचा मोठा वाटा आहे. इस्त्रायलमधील काही अॅग्रीटेक स्टार्टअपची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
अॅग्रोस्काऊट (AgroScout)
अॅग्रोस्काऊट, पीक व्यवस्थापनाचे तंत्रशुध्द विश्लेषण करण्यासाठी आवश्यक डेटा संकलित करुन तो एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकर्यांना अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध करुन देते. अॅग्रोस्ककाऊट हे स्टार्टअप शेतकर्यांना कमी किमतीत व्यावसायिक ड्रोन सेवा उपलब्ध करुन देते. त्यामाध्यमातून रोग आणि कीटकांची अचूक माहिती उपलब्ध होत असल्याने पिकांचे रक्षण होवून उत्पादन देखील वाढते. यात ड्रोन संपूर्ण क्षेत्राचे छायचित्र काढते. त्या छायाचित्रांचे आर्टिफिशयल इन्टिलिजन्सच्या मदतीने विश्लेषण करुन शेतकर्यांना अचूक सल्ला दिला जातो. ज्याची माहिती शेतकर्यांना त्याच्या स्मार्टफोनवर उपलब्ध होते. सिम्चा शोर नावाच्या तरुणाने २०१७ मध्ये या स्टार्टअपची स्थापना केली असून यास ११ मिलियन डॉलर्सची फंडिंग देखील मिळाली आहे.
ग्रीनआय टेक्नोलॉजी (Greeneye Technology)
ग्रीनआय टेक्नोलॉजी या स्टार्टअपने शेती व शेतकर्यांसाठी एआय तंत्रज्ञानावर आधारित अचूक तणनाशक फवारणी तंत्रज्ञान विकसित केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन योग्य प्रमाणात व परिणाम कारण तणनाशकांचा वापर करण्यात यांचा मोठा हातखंड आहे. ग्रीनआय सिलेक्टीव्ह स्प्रेअरिंग सिस्टिम कोणत्याही कृषी स्प्रेअरमध्ये सहजपणे फिट बसते. विद्यमान स्प्रेअर्सचे रीट्रोफिटिंग करून किंवा स्प्रेअर उत्पादकांच्या सहकार्याने वनस्पती-स्तरीय व्हेरिएबल-रेट फवारणी वितरीत करण्यासाठी. कंपनीच्या मते, तिची प्रक्रिया ९० टक्के पर्यंत तणनाशक आणि रासायनिक वापर कमी करण्यात यशस्वी आहे. नादव बोचर, इत्झाक खैत, अॅलॉन ऑर्बक यांनी २०१७ मध्ये याची स्थापना केली असून त्यांना ३२ मिलियन डॉलर्सची फंडिंग मिळाली आहे.
तारानीस (Taranis)
अॅग्रिकल्चरल इंटेलिजेंस कंपनी तारानिस ड्रोन आणि लो-फ्लायंग एरियल वाहने चालवते जे मध्य-उड्डाणात अल्ट्रा-हाय-रिझोल्यूशन इमेजरी कॅप्चर करण्यास सक्षम आहे. तारानीसची कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली या प्रतिमांचे विश्लेषण करते आणि पिकावरील रोग, कीटकांचा प्रादुर्भाव, पोषक तत्वांची कमतरता आणि इतर पिकांच्या जोखीम घटकांची प्रारंभिक चिन्हे शोधण्यासाठी हा डेटा तसेच उपग्रह प्रतिमांमधील डेटा एकत्रित करते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, तारानीस प्रणाली २० मिनिटांपेक्षा कमी वेळात ४,००,००० चौरस मीटर क्षेत्र व्यापू शकते. ऑरिफ सॉचलॅम, एली बुकचिन, असाफ होरोविट्झ, अयाल कर्मी यांनी २०१४मध्ये याची स्थापना केली असून त्यांना ५९.५ मिलियन डॉलर्सची फंडिंग मिळाली आहे.
मायक्रॉप्स (MyCrops)
मायक्रॉप्सचे तंत्रज्ञान हानिकारक कीटकनाशकांचा वापर कमी करून शास्वत शेतीला चालना देण्याचा प्रयत्न करते. कंपनीने शेतकर्यांसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला आहे जो विविध अत्याधुनिक अल्गोरिदमच्या मदतीने पिकांच्या प्रतिमांचे विश्लेषण. याचा परिणाम म्हणजे खर्चात कपात, कीटकनाशकांचा वापर कमी होणे आणि शेतकर्यांच्या वार्षिक नुकसानाच्या ६२ टक्के पर्यंत घट होत असल्याचा कंपनीचा दावा आहे. कंपनीची प्रणाली २४ तास स्वयंचलित वनस्पती निरीक्षण प्रदान करते आणि उत्पादकांना निष्कर्षांवर आधारित निर्णय घेण्यास मदत करते. असफ लेव्ही, असफ गाविश यांनी २०१६ मध्ये याची सुरुवात केली आहे.
फर्माटा (Fermata)
फर्माटा कॉम्प्युटर व्हिजन अॅनालिसिसचा वापर करून ग्रीनहाऊसमध्ये वनस्पतींचे अचूक निरीक्षण करण्यासाठी एआय सक्षम निर्णय समर्थन प्रणाली तयार करते. स्टार्टअपचे क्रॉप्टिमस प्लॅटफॉर्म आपोआप कीड आणि रोग त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यावर शोधून काढते, परवानाधारक उत्पादक आणि उत्पादकांना पीक नुकसान ३० टक्के कमी करण्यात मदत करते. अॅलिस्टर मंक, व्हॅलेरिया कोगन यांनी २०१८ मध्ये याची स्थापना केली असून त्यांना २.५ मिलियन डॉलर्सची फंडिंग मिळाली आहे.
ऍग्रीटास्क (Agritask)
अॅग्रीटास्क एआय नियंत्रित कृषी व्यवस्थापन विकसित करते. ऑन-द-ग्राउंड सेन्सर्स आणि सॅटेलाइट इमेजेस यांचा एकत्रित विश्लेषण करुन शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन केले जाते. याचा वापर ३५ पेक्षा जास्त देशांमध्ये सुरु आहे. या माध्यमातून शेतकर्यांना ५० पेक्षा जास्त वेगवेगळ्या पिकांसाठी वाढ कशी अनुकूल करावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात येते. इस्रायल फ्रेयर यांनी २०१० मध्ये याची स्थापना केली असून त्यांना ३८.८ मिलियन डॉलर्सची फंडिंग मिळाली आहे.