काळी मिरी लागवडीसाठी असा केला जातो प्रयोग

- Advertisement -

नागपूर : भारतात मोठ्या प्रमाणातील क्षेत्रावर मसाल्याचे पदार्थांचे उत्पादन घेतले जाते. यामुळेच मसाल्यांच्या निर्यातीमध्ये भारताचा पहिला क्रमांक आहे. मसाला पदार्थांपैकी मोठ्या प्रमाणात लागवड होते ती काळ्या मिरीची!
काळ्या मिरीचा वापर शक्यतो गरम मसल्यासाठी केला जातो. शिवाय उत्पादनखर्च कमी असून बाजारातील दर हे कायम चढलेलेच असतात. देशात सर्वाधिक लागवड ही केरळात केली जात आहे. महाराष्ट्रातही काही शेतकरी काळ्या मिरीची लागवड करतात.

असे हवे वातावरण

या मिरचीसाठी तीव्र सुर्यप्रकाश आणि योग्य आर्द्रता असलेले वातावरण पोषक असते. यामध्ये साधारणत: १० ते ४० अंशापर्यंत तापमान आणि आर्द्रतेचे प्रमाण हे ६० ते ७० टक्के असणे आवश्यक आहे. अशा वातावरणात काळी मिरीची वाढ झपाट्याने होते. सुपीक जमीन तिच्या लागवडीसाठी सर्वात योग्य मानली जाते. शिवाय येथील शेतीचे पीएच मूल्य ४.५ ते ६ च्या दरम्यान असते म्हणून चांगले उत्पादन मिळते.

दोन टप्प्यात पेरणी

काळी मिरीचीची दोन टप्प्यात पेरणी होते. पहिल्या टप्प्यात वनस्पती तयार होते आणि दुसर्‍या टप्प्यात रोपाचे प्रत्यारोपण केले जाते. दुसर्‍या टप्प्यातील मिरीची ही झाडांच्या मुळाजवळ लावली जाते. त्यामुळेच वेलीप्रमाणे ती झाडावर वाढते आणि उत्पादनही अधिकचे मिळते.

अशी घ्या काळजी

काळ्या मिरीचे रोप तयार करण्यासाठी जुन्या वेलींवरुन या मिरीची छाटणी करावी लागते. छाटणी केलेल्या मिरीला माती आणि खताने भरलेल्या पॉलिथीनच्या पिशव्यांमध्ये ठेवावे लागते. या प्रक्रियेच्या ५० ते ६० दिवसांनंतर याचे रोप लागवडी योग्य होते. रोपांसाठी एक हात रुंद आणि इतका खोल खड्डा खणला जातो. रोपवाटिकेनंतर तातडीने पाणी द्यावे लागते. मिरचीच्या वेली वाढल्या की, त्यावर हिरवे गुच्छ दिसू लागतात. गुच्छात एकापेक्षा जास्त फळे दिसले की नोव्हेंबरमध्ये तोडणी करता येणार आहे. योग्य जोपासणा झाली तर एका रोपाला साधारणतः दीड किलो कोरडी काळी मिरी मिळते.

हे देखील वाचा :

हे देखील वाचा