रक्तदाब, मधुमेह, कर्करोगावर गुणकारी मानला जातो काळा गहू, वाचा सविस्तर

- Advertisement -

औरंगाबाद : औषधी महत्व असलेल्या काळ्या गव्हाची (Black Wheat) पेरणी आता महाराष्ट्रात देखील होवू लागली आहे. हा गहू रक्तदाब, मधुमेह, कर्करोग यावर गुणकारी असल्याचा दावा केला जातो. गत हंगामात नांदेड, अकोला, पुण्यासह अनेक ठिकाणी हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता यंदाच्या रब्बी हंगामात औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंग्री शिवारात तर काळ्या तांदळाचा प्रयोग केला जात आहे. कृष्णा फलके नावाच्या शेतकऱ्याने काळ्या गव्हाचा पेरा केला आहे. पारंपरिक गव्हाप्रमाणेच याची पेरणी पध्दत आहे.

काळ्या गव्हाला ६ हजार ५०० चा सरासरी दर

काळ्या गव्हाचे वाण हे पंजाब कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आहे. सर्वात प्रथम हे पंजाब, हरियाणा या राज्यात तर आता हळूहळू हे वाण इतर राज्यांमध्येही पेरले जात आहे. पेरणीकरिता एकरी ४० किलोपेक्षाही कमी बियाणाची आवश्यकता असते. तर १० ते १२ क्विंटल याला एकरी उतार आहे. सेंद्रिय खताचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होते. बाजारपेठेत काळ्या गव्हाला ६ हजार ५०० चा सरासरी दर मिळतो.

काळ्या गव्हाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली

वातावरणातील बदलाचा परिणाम हा तसा प्रत्येक पिकावर पाहवयास मिळतो. मात्र, काळ्या गव्हाची रोगप्रतिकार शक्ती ही चांगली आहे. त्यामुळे यावर मावा, तुडतुडे याचा परिणाम होत नाही. शिवाय या पिकाचे मुळ ही मजबूत असल्याने ओंब्या ह्या खाली जमिनीवर पडत नाहीत तर अवकाळी पावसामुळेही याचे नुकसान होत नाही. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीपासून याचा बचाव होतो. पीक पध्दतीमध्ये बदल म्हणून प्रायोगिक तत्वावर याचे सध्या तरी उत्पादन घेतले जात आहे. आता किती उत्पादन होते यावरच भविष्यातील पेरा अवलंबून आहे.

हे देखील वाचा