पुणे : मोदी सरकारने २०२२ पर्यंत शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार केला असून गेल्या ६ वर्षात सरकारने काय प्रयत्न केले आहेत याची माहिती खुद्द केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नुकतीच लोकसभेत दिली. यामध्ये त्यांनी सप्तसुत्री कार्यक्रम सांगितला असून तो प्रत्येक शेतकर्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे.
असा आहे सप्तसूत्री कार्यक्रम
१.पीक उत्पादनात वाढ
२.पशूधनातून उत्पादनात वाढ
३.उत्पादन खर्च कमी आणि शेतकर्यांना संसाधनाचा वापर करुन त्यांचे काम सुखकर करुन देणे.
४.एका वर्षामध्ये एकच पीक न घेता यामध्ये वाढ करणे
५.अधिकचे उत्पन्न मिळेल असेच उत्पादन घेण्यावर भर देणे
६.शेतीमालाच्या विक्रीतून शेतकर्यांना त्यांची चांगली किमंत मिळवून देण्याचा प्रयत्न
७.शेती या मुख्य व्यवसायाबरोबरच इतर जोडव्यवसयातून उत्पन्न वाढविणे
केंद्र सरकारने २०१६ सालीच शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण आखले होते. याकरिता आंतरमंत्रालयीन समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने २०१८ सरकारला एक अहवाल सादर केला आहे. यामध्ये २०२२ पर्यंत शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल हे स्पष्ट करण्यात आले आहे. या समितीनेच शेतीला मूल्याधारित उद्योग म्हणून मान्यता दिली आहे. तसेच सप्तसुत्री कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी एका संस्थेची उभारणी देखील करण्यात आली असल्याची माहिती नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली आहे.
हे पण वाचा :