मुंबई : पीएम किसान योजनेचा १२ हप्ता वितरित झाल्यानंतर शेतकरी १३व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या १३व्या हप्त्यापूर्वी सरकारने मोठी माहिती दिली आहे. तुम्हीही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल, तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. गेल्या वर्षी १ जानेवारी रोजी केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचे २००० रुपये शेतकर्यांच्या खात्यात वर्ग केले. यंदाही जानेवारीच्या सुरुवातीलाच सरकार शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा करेल, अशी अपेक्षा आहे.
तुम्हालाही या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावे. तसे नसल्यास तेराव्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल, आता शेतकरी कॉर्नरवर जा. येथे तुम्हाला ‘नवीन शेतकरी नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर आधार क्रमांक टाकावा लागेल.
यासोबतच कॅप्चा कोड टाकून राज्याची निवड करावी लागेल आणि त्यानंतर ही प्रक्रिया पुढे करावी लागेल. या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागेल. यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.