• आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
ShetShivar | शेतशिवार
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक
No Result
View All Result
ShetShivar | शेतशिवार
ShetShivar | शेतशिवार
No Result
View All Result
paramparagat-krushi-vikas-yojan-1

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?

soyabea-tur

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती

rain-updates-story

Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

इंडिया अ‍ॅग्री बिझनेस अवॉर्ड्स 2022 पुरस्काराने जैन फार्म फ्रेश फुडस् चा सन्मान

डॉ. युवराज परदेशीbyडॉ. युवराज परदेशी
in बातम्या
November 14, 2022 | 11:00 am
krushi award

नवी दिल्ली : भारतीय अन्न आणि कृषी परिषद (ICFA) यांच्यावतीने 9 ते 11 नोव्हेंबर 2022 दरम्यान नवी दिल्ली येथे देशातील सर्वात मोठे कृषी संमेलन, प्रदर्शन ‘अॅग्रोवर्ल्ड 2022’ पार पडले. त्यात अन्न प्रक्रिया श्रेणी करीता जैन फार्म फ्रेश फुडस् लिमिटेडला ‘इंडिया अ‍ॅग्री बिझनेस बिझनेस अवॉर्ड्स 2022’ ने सन्मान करण्यात आला. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री डॉ. संजीव कुमार बलियान यांच्या हस्ते कंपनीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी.के. यादव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

आय ए आर आय मैदान, पुसा, नवी दिल्ली येथे भव्य प्रदर्शन आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील झाले. त्यात शाश्वत शेतीचे तंत्र, काढणीनंतरचे व्यवस्थापन, प्रक्रिया आणि विपणन, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी परिवर्तन, शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी व्यापार, ई-कॉमर्सद्वारे शेतकर्‍यांचे सक्षमीकरण: एफपीओची भूमिका इत्यादी विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

जैन फार्म फ्रेश फुडस् लि. चे कार्य अधोरेखित करून अन्न प्रक्रिया श्रेणीमधून ‘इंडियन अ‍ॅग्री बिझनेस अवॉर्डस् 2022’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जगातील सर्वांत मोठ्या प्रमाणावर आंब्यावर प्रक्रिया करणारी एक नंबरची तर कांदा भाजीपाला निर्जलीकरण करणारी सर्वात मोठी कंपनी म्हणून जैन फार्म फ्रेश फुडस् लिमिटेडची ओळख आहे. या कंपनीचे वार्षिक जागतिक उत्पन्न 1600 ते 1800 कोटी रुपये आहे.

तिचे मुख्य कार्यालय जळगाव (महाराष्ट्र) येथे आहे. मागील 5 वर्षात 80000 मे. टनांहून अधिक कांदयावर प्रक्रिया केली गेली. त्यासाठी 9 जिल्हे, 31 तालुके, 435 खेडे आणि 10000 हून अधिक शेतकऱ्यांकडून करार शेतीवर माल खरेदी करून प्रक्रिया केली. कंपनीने दिलेल्या तंत्रामुळे शाश्वत शेती करता येते आणि शेतकऱ्यांची उपजिविका व ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे उत्पन्न यात सुधारणा झाली,  ही सुधारणा सातत्याने होतच आहे.

जैन फार्म फ्रेश फुडस् लि. शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञांचा सल्ला, उत्तम दर्जाचे बी-बियाणे, 100 हून अधिक कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन देते. शेतकऱ्यांकडून ताजे कांदे उत्तम भावात खरेदी करते. अल्पभूधारक आणि मध्यम आकाराची जमीन असलेल्या शेतकऱ्यांना भारतात जैन गॅप अंतर्गत उत्तम शेती पद्धती (Good Agriculture Practices- गॅप) हा भारतातील कृषी क्षेत्रातील पहिला उपक्रम ही कंपनी राबवते. हा उन्नती उपक्रम जे जैन फार्म फ्रेश फुडस् संयुक्तपणे शेतकऱ्यांसोबत भागीदारीत राबवते. या उपक्रमात शेतकऱ्यांना अती सघन लागवड पद्धत (Ultra High Density Plantation-युएचडीपी) शिकवली जाते. 

सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का?
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट
Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

ताज्या बातम्या

banana

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे?

December 21, 2022 | 12:38 pm
RTM8115

सातबारावर स्त्रीयांचे नाव हवे; वाचा सविस्तर

November 26, 2022 | 10:45 am
rubber

रबर शेती कशी करतात तुम्हाला माहित आहे का?

November 16, 2022 | 3:02 pm
indian currency

नोव्हेंबर महिन्यात ही पाच पिकं मिळवून देतील बंपर नफा

November 16, 2022 | 2:14 pm
mirchi

मिरचीचे नवे वाण विकसित, प्रति हेक्टरी १४० क्विंटल उत्पादन

November 16, 2022 | 2:10 pm
Maize

या बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

November 16, 2022 | 12:35 pm
Next Post
geranium

जिरेनियम शेती : एक एकरमधून चार लाखांचे उत्पन्न

  • आमच्या बद्दल
  • Contact us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • बाजारभाव
  • हवामान
  • पीक लागवड
  • सेंद्रिय शेती
  • तंत्रज्ञान
  • यशोगाथा
  • सरकारी योजना
  • आरोग्य
  • शैक्षणिक

© 2022. Website Design Tech Drift Solutions.

WhatsApp Group
सोयाबीन अन् तुरीचे बाजारपेठेतील चित्र बदलले; पहा काय आहे स्थिती शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान; पहा तुम्ही पात्र आहात का? Weather Alert : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; ४ जिल्ह्यांत ऑरेंज, तर ८ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट