पुणे : मोबाईलवरुन ई-पीक पाहणीची नोंद करण्याच्या प्रक्रियेला १ ऑगस्ट पासून राज्यभर सुरवात झाली आहे. यात शेतकरी कुणाच्याही मदतीविना आपल्या जवळील स्मार्टफोनच्या माध्यमातून पीक पेरणीची नोंद करणार आहे. सरकारच्या धोरणांनुसार ई-पीक पाहणीनुसार नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने शेतकर्यांसाठी ई-पीक नोंदी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ई-पीक पाहणीच्या माध्यमातून शेतकर्यांनी केलेला पेरा थेट शासनाकडे नोंदवला जाणार आहे. त्याअनुशंगाने कोणत्या पिकाचे किती क्षेत्रावर उत्पादन घेतले आहे. शिवाय शेतकरी नुकसानभरापईसाठी पात्र आहे. राज्यात पीकपेरा किती आदी बाबींची माहिती ही सरकारला राहणार आहे.
ई-पीक पाहणीसाठी अशी करा प्रक्रिया पूर्ण
शेतकर्यांना ‘प्ले स्टोअर’ मधून ‘ई-पीक पाहणी व्हर्जन २’ असं नाव टाकून हे अॅप डाऊनलोड करुन घ्यायचे आहे. त्यानंतर हे अॅप ओपन केल्यानंतर ई-पीक पाहणी नावाचे होम पेज ओपन होईल. यामध्ये शेतकर्यांनी आपला महसूल विभाग टाकून पुढची प्रक्रिया करायची आहे.
यानंतर नवीन खातेदार नोंदणी हा पर्याय निवडावा लागणार आहे. खातेदार होण्यासाठी समोर विचारण्यात आलेली माहीती शेतकर्यांना भरावी लागणार आहे. यामध्ये विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव हे पर्याय निवडावे लागणार आहेत. त्यानंतर शेतकर्यास आपले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून शोधा या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर सांकेतिक नंबर टाकून प्रत्यक्ष ई-पीक पाहणी या प्रक्रियेला सुरवात करावी लागणार आहे.
होमपेजवरील पीक माहिती नोंदवा हा पर्याय निवडावा लागणार आहे. यामध्ये शेतकर्यास खाते क्रमांक, गट क्रमांक, जमिनीचे एकूण क्षेत्र, हंगाम, पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र, पिकाचा वर्ग, क्षेत्र, जल सिंचनाचे साधन, सिंचन पध्दती, पेरणीची तारिख आदी माहिती भरावी लागणार आहे.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अक्षांश-रेखांश मिळवावा लागणार आहे. त्यानंतर शेतकर्यांना आपण निवडलेल्या गटात जाऊन पिकाचा फोटो काढावा लागणार आहे. पिकाचा फोटो अपलोड केला की, सर्वकाही सहमती आहे का? असे विचारले जाते त्यानुसार ेज्ञ म्हणले की आपली माहिती अपलोड करीत आहोत थोड्याच वेळात ती पूर्ण होईल असे सांगितले जाते. ही प्रक्रीया पूर्ण झाल्यावर ई-पीक पाहणीही पूर्ण होते.