औरंगाबाद : राज्यात पावासाचे धिम्या पावलांनी आगमन झाले असले तरी मराठवाड्यात अजूनही पावसाची एंन्ट्रीच झालेली नाही. जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील काही भाग वगळता उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्वही पाऊस दाखल झालेला नाही. त्यामुळे पेरण्या तर सोडाच पण अजून शेत शिवारात पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरु आहेत. त्यामुळे पेरण्या तर लांबणीवर पडणारच आहेत.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पेरणीसाठी अपेक्षित पाऊसच झालेला नाही. उत्पादनाच्या दृष्टीने खरीप हंगामाच महत्वाचा असताना पावसाच्या या लहरीपणामुळे पेरणी करावी का नाही अशा सभ्रमात राज्यातील शेतकरी आहे. ज्या वेगाने १० जून रोजी पाऊस तळकोकणात दाखल झाला तो वार्याचा वेग कायम पुढे राहिलाच नाही. शिवाय पावसळ्यापूर्वी वार्याचा वेगही यंदा मंदावलेला होता. याचा परिणाम म्हणून मान्सूनचे दमदार आगमन अद्यापही लांबत आहे.
खरिपाच्या पेरणीसाठी शेतकर्यास प्रतीक्षा आहे ती अपेक्षित पावसाची. मात्र, मराठवाड्यात असून पावसाने सुरवातच केली नसल्याने पेरण्या लांबणीवर पडणार हे निश्चित मानले जात आहे. मराठवाड्यात सोयाबीन हे खरिपातील मुख्य पीक आहे. त्यामुळे चाढ्यावर मूठ ठेवण्यास उशीर झाला तर शेतकर्यांनी बियाणे वाणामध्ये बदल करणे अपेक्षित आहे.