औरंगाबाद : महाराष्ट्रात चवळी मिश्र पीक म्हणून घेतळे जाते तर काही ठिकाणी पट्टे पध्दतीने लागवड केली जाते. अलिकडे मोठ्या शहरांच्या जवळपास भाजीच्या चवळीची ळागवड व्यापारीदृष्ट्या केली जाते. उन्हाळी पिकाची लागवड जानेवारी- मार्च तर खरीप हंगामात जून- जुलै महिन्यात करतात. तसेच बागायती पीक म्हणून हे पीक घेता येते.
प्रकार : सर्वसाधारणपणे चवळीचे तीन प्रकार आढळून येतात :
१) लांब शेगांची चवळी : यालाच बाली किंवा यार्डबीन म्हणतात, झाडे वेलीसारखी वाढतात. शेंगांची लांबी ३० ते ९० सें.मी. पर्यंत असते.
२) गोल शेंगाची चवळी : या प्रकारात शेंगांची लांबी ७ ते १२ सें.मी. पर्यंत असते. बिया आकाराने लहान असतात.
३) सर्वसाधारण चवळी : ही झाडे बुटकी ते मध्यम आकाराची असतात. काही जाती वेलीसारख्या वाढतात.
चवळी लागवडीपूर्वी जमीन नांगरून, कुळवून भुसभुशीत करावी व त्यात हेक्टरी १५ ते २० टन शेणखत मिसळावे. त्यानंतर सोयीनुसार वाफे किंवा सर्या पाडाव्यात व बी टाकावे. दोन ओळीतील अंतर ४५ ते ६० सें. मी. ठेवावे आणि विरळणी करून दोन रोपात २० ते ३० सें. मी. अंतर ठेवावे. हेक्टरी १५ ते २० किलो बी लागते.
सुधारित जाती :
१) कोकण सफेद : ही जात ७५ ते ८० दिवसात येणारी असून तिला हिरबी गार पालवी व पांढर्या रंगाची फुले येतात. शेंगा खालच्या अर्धा भागापर्यंत लागतात. ही जात विषाणूजन्य रोगास प्रतिकारक आहे. या जातीपासून १४ क्विंटलपर्यंत हेक्टरी उत्पादन मिळते.
२) कोकण सदाबहार : हि जात बुटकी असून लबकर तयार होते. शेंगा व पाने हिरव्या रंगाची असून लवकर येणारी उपयुक्त जात आहे. या जातीपासून १३ ते १४ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
३) पुसा- दो-फसली : ही जात उन्हाळी ब पाबसाळी या दोन्ही हंगामात घेता येते. झाडे झुडूपबजा वाढणारी असून शेंगाची लांबी १८ ते २० से.मी. पर्यंत असते. या जातीपासून ८० ते १०० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
४) अको गरीमा : या जातीच्या शेगांची लांबी २० ते २५ सें.मी. असून जाडी इतर चवळीच्या प्रचलित जातीच्या शेंगांपेक्षा जास्त असते. शेंगेत गराचे प्रमाण जास्त असल्याने भाजीसाठी ती जात उत्तम आहे. हेक्टरी १२० ते १५० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
५) पुसा कोमल : या जातीच्या शेगांची लांबी २० ते २२ सें.मी. पर्यंत असून, रंग हिरवा असतो. दाणा पांढरा, गोळ, लांबट आणि जाडा असल्याने उसळीसाठी ही जात चांगली आहे. शेंगांचे हेक्टरी उत्पादन १०० ते ११० क्विटलपर्यंत मिळते.
६) पुसा फाल्गुनी : शेंगा गडद -हिरव्या रंगाच्या १२ ते १५ सें.मी. लांब असतात. लागवडीपासून ६० दिवसात शेंगा काढणीस तयार होतात. हेक्टरी ८० ते ९० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
७) पुसा बरसाती : ही जात खरीप हंगामासाठी उपयुक्त आहे. शेंगेची लांबी २० ते २५ सें.मी. पर्यंत असते. ही जात लागवडीपासून ४५ दिवसात काढणीला तयार होते. हेक्टरी ७५ ते ८० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.