जळगाव : केळी हे पोष्टीक फळ आहे. त्यामध्ये साखर, प्रथिने, स्निग्ध पदार्थां लोह, स्फुरद ही खनिजे आणि क व अ ही जीवनसत्चे केळीमध्ये आहेत. केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. केळीच्या फळाचे अनेक टिकाऊ पदार्थ व लगेच खाण्याचे पदार्थ तयार होऊ शकतात. याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
चिप्स
केळीपासून तयार केल्या जाणार्या पदार्थांमध्ये सर्वात लोकप्रिय म्हणजे चिप्स. अनेक केळी उत्पादक जिल्ह्यांमध्ये केळी चिप्स तयार करण्याचे प्रमाण अधिक असते. अगदी महामार्गाच्या बाजूलाही चिप्स तयार करुन त्याची विक्री करणारे आढळून येतात.
पीठ
केळीचे पीठ तयार करण्यासाठी कच्ची केळी वापरले जातात. यासाठी प्रथम केळी स्वच्छ पाण्याने धुऊन, साल काढून त्याच्या चकत्या किंवा बारीक तुकडे करून सुकवतात. त्यानंतर या चकत्यांपासून दळणी यंत्राचा वापर करून पीठ तयार करतात. शेव, चकली, गुलाबजाम इत्यादी उपवासाचे पदार्थ तयार करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.
भुकटी
केळीच्या भुकटीला परदेशात भरपूर मागणी आहे. यासाठी पूर्ण पिकलेली केळी वापरतात. प्रथम केळी स्वच्छ पाण्याने धुऊन घेतात. केळीची साल काढून पल्पर यंत्राच्या सहाय्याने लगदा करून घेतात. केळीच्या गराच्या लगद्याची भुकटी स्प्रे ड्रायर किंवा ड्रम ड्रायर किंचा फोम मेंट ड्रायरच्या सहाय्याने करतात. तयार झालेली भुकटी निर्जतुक हवाबंद डब्यात साठवून कोरड्या व थंड जागी साठवितात. त्याचा वापर लहान मुलांच्या आहारात केला जातो. बिस्किटे व बेकरीमध्ये तसेच आइस्क्रोममध्ये केळीच्या भुकटीचा वापर केला जातो.
जेली
याचा वापर जेली चॉकलेट तयार करण्यासाठी केला जातो. यासाठी केळी फळाचा गर पाण्यात एकजीव करून १५ ते २० मिनिटे गरम करावा. गरगाळून घ्यावा. गाळलेल्या गरात समप्रमाणात साखर, ०.५ टक्के सायट्रेकि आम्ल व पेक्टीन टाकून उकळी येईपर्यंत शिजवावे. या वेळी मिश्रणाचे तापमान साधारणपणे १०४ अंश सेल्सिअस असते. तयार जेलीमध्ये एकूण घन पदार्थाचे प्रमाण ७० डिग्री ब्रिक्स इतके असते. जेली गरम असतांनाच निर्जंतूक बाटल्यांमध्ये भरावी.
जॅम
कोणत्याही जातीच्या पूर्ण पिकलेल्या केळीचा वापर जॅम तयार करण्यासाठी करता येतो. गराच्या वजनाएवढी साखर मिसळून गर मंद अग्रीवर शिजवावा. साखर पूर्णपणे विरघळल्यावर ०.५ टक्के पेक्टीन ०.३ टक्के सायट्रेकि आम्ल व रंग टाकून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे. मिश्रणाचा ब्रिक्स ६८ ते ७० डिग्री झाल्यावर जॅम तयार झाला, असे समजावे.
केळ्याचे सुके अंजीर
पूर्ण पिकलेली केळी सोलून, पोटॅशियम मेटाबायसल्फाईडच्या १ टक्के द्रावणात बुडवून घ्या. नंतर त्याचे २.५ मि.मी. काप बनवून उन्हात वाळवा किंवा ५० अंश से. तापमानाला २४ तास ओव्हनमध्ये किंवा ड्रायरमध्ये ठेवून वाळवा. पॉलिथीनच्या पेशिव्यांमध्ये हवाबंद करून ठेवल्यास ४ ते ६ महिने सहज टिकतात. सुक्या अंजिराप्रमाणे ही अंजीर अत्यंत चविष्ट लागतात.
केळी बिस्कीट
केळी पिठात ३० टक्के मैदा मिसळून त्यामध्ये साखर, वनस्पती, तूप, बेकिंग पावडर, दूध पावडर, इसेन्स गरजेप्रमाणे मिसळ. योग्य प्रमाणात पाणी घेऊन त्याचा लगदा करा. हा लगदा साच्यात टाकून ओव्हनमध्ये ठेवून द्या. ही बिस्किटे अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असतात.
बनाना प्युरी
प्युरी म्हणजे पिकलेल्या ताज्या फळातील गर. त्यामध्ये ताज्या फळांचा मूळ स्वाद, रंग, सुगंध कायम राहील, याची दक्षता घेतली जाते. प्युरीचा वापर मिल्कशेक, आइस्क्रीम, फळांचा रस इत्यादी विविध पदार्थात केला जातो. पिकलेल्या केळ्याचा गर पल्पर मशीनमधून काढून लगदा हवाविरहित करतात व निर्जतुकीकरण करून हवाबंद डब्यात भरुन ठेवतात. गर टिकविण्यासाठी त्यात कोणत्याही प्रकारच्या रसायनाचा अथवा साखरेचा वापर केला जात नाही.
व्हिनेगर
अतिपक्र व खाण्यास योग्य नसलेल्या केळीपासून व्हिनेगर तयार करता येतो. केळीचा गर पाण्यात मिसळून घ्यावा. त्यात यीस्ट टाकून ४८ तास मिश्रण स्थिर ठेवा. त्यात माल्ट व्हिनेगरचे मुरवण २े ते ३े मि.लि. प्रति लिटर या प्रमाणात मिसळावे. हे मिश्रण ३० अंश से.तापमानात आांबवण्यास ठेवावे. ही रासायनिक किंवा (अॅसिडीफिकेशन) दोन ते तीन आठवड्यात पूर्ण होते. नंतर सेंट्रेफ्यिूज करून व्हिनेगर वेगळे करतात व निर्जतुक केलेल्या स्वच्छ बाटल्यांत भरून हवाबंद साठवितात.