पुणे : शेतात जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून विशिष्ट वाणांना पसंती दिली जाते. यासाठी कृषी क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित कंपन्या संशोधन करुन नवं नवीन वाण बाजारपेठेत उपलब्ध करुन देत असतात. मात्र दौड तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने स्वत:च्यात नावाचे कांद्याचे वाण विकसित केले असून त्यास ‘संदीप कांदा’ असे नाव दिले आहे. कांद्याच्या वाणाला ‘संदीप कांदा’ असे नाव देण्याचे कारण म्हणजे त्या शेतकऱ्याचे नाव आहे संदीप घोले!
बनावट बियाणे ही शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी डोकंदुखी ठरते. कारण बियाणे खरेदी करतांना कोणते बियाणे ओरिजनल व कोणते बनावट? हे लवकर लक्षात येत नाही. पेरणी झाल्यानंतर जेंव्हा लक्षात येते तेंव्हा वेळ निघून गेलेली असते. हा धोका टाळण्यासाठी संदीप घोले या शेतकऱ्याने स्वतःच्या नावाची कांद्याची जात विकसित केली आहे. यासाठी त्यांनी आठ वर्षे संशोधन केले आणि संदीप कांदा या वाणाची निर्मिती केली. या वाणाची टिकवण क्षमता सात ते आठ महिने इतकी आहे. सोबतच याची रोगप्रतिकारक क्षमता देखील जास्त आहे.
संदीप कांदा ही कांद्याची जात शेतकऱ्याना फायदेशीर असल्याने आठ राज्यातील जवळपास एक हजार पेक्षा जास्त शेतकरी त्यांना जोडले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या उत्पादनात सरासरी हेक्टरी ७ ते ८ टनाचा फरक पडला आहे. सोबतच उत्पादन खर्च देखील कमी झाला आहे. संदीप कांदा हा इतर कांद्या पेक्षा तीन ते चार महिने जास्त टिकतो. त्यामुळे शेतकर्यांना त्याचा मोठा फायदा होतो. या संशोधनासाठी संदीप घोले यांना २०१९ साली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.
हे देखील वाचा :